पुणे विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलल्या

म. टा. प्रतिनिधी, पुणे करोनाच्या पार्श्वभूमीवर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने ' सर्व प्रकारच्या परीक्षा १४ एप्रिलपर्यंत स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, आता परीक्षा एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात घेण्याचे नियोजन करण्यात येत आहे. पुणे विद्यापीठातर्फे घेण्यात येणाऱ्या दुसऱ्या सत्राच्या परीक्षा मार्च महिन्याच्या शेवटच्या टप्प्यात सुरू होत्या. ''चा प्रभाव वाढत असल्याने शाळा, महाविद्यालय, विद्यापीठांना सुट्टी जाहीर करण्यात आली. तर, विद्यार्थ्यांना वसतीगृह सोडण्याचे आदेश देण्यात आले. विद्यार्थी गावाकडे गेल्या विद्यापीठाने ३१ मार्च पर्यंतच्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता. देशातील स्थिती गंभीर होत असताना १४ एप्रिल पर्यंत संपूर्ण देश लाॅकडाऊन आहे. मात्र विद्यापीठाकडून परीक्षेसंबंधी भूमिका जाहीर केली नव्हती. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला, विद्यापीठाने 'करोना'मुळे उद्भवलेल्या स्थितीचा आढावा घेत परीक्षा १४ एप्रिल पर्यंत स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात पुणे, नाशिक, नगर जिल्ह्यातील संलग्न महाविद्यालयांना हा निर्णय कळविण्यात आला आहे, असे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. महेश काकडे यांनी सांगितले.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2y85nYC
via IFTTT

Post a Comment

0 Comments