सीबीएसई बारावीचा पुनर्मूल्यांकन निकाल जाहीर

class 12th revaluation result 2020 direct link: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) ने बारावीच्या पूनर्मूल्यांकनाचा निकाल जाहीर केला आहे. बोर्डाने आपले अधिकृत संकेतस्थळ cbse.nic.in आणि अधिकृत निकाल संकेतस्थळ cbseresults.nic.in वर निकाल जाहीर करण्यात आला आहे. ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या उत्तरपत्रिकांच्या पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज केले होते, ते विद्यार्थी आपला निकाल सीबीएसईच्या संकेतस्थळावर तपासू शकतात. याव्यतिरिक्त या बातमीतही पुढे थेट लिंक दिल्या आहेत, जेणेकरून विद्यार्थी-पालकांना सहजपणे या निकालाच्या संकेतस्थळावर जाता येईल. evaluation result 2020: कसा पाहाल निकाल? सीबीएसई निकालाच्या संकेतस्थळावर जा. याचा थेट लिंक पुढे देण्यात येत आहे. होम पेजवर सीनिअर स्कूल सर्टिफिकेट एक्झाम (इयत्ता १२ वी) निकाल २०२० लिंकवर क्लिक करा. नवं पेज उघडेल. येथे दिलेल्या जागी तुमचा रोल नंबर, शाळा, सेंटर क्रमांक, हॉल तिकिट आयडी नोंदवा आणि सबमीट करा. आता स्क्रीनवर तुमचा निकाल दिसेल. निकाल डाऊनलोड करून एक प्रिंट घेऊन सुरक्षित ठेवा. CBSE results च्या वेबसाइट वर जाण्यासाठी CBSE re-evaluation result 2020 थेट लिंक साठी


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/32G7UF8
via IFTTT

Post a Comment

0 Comments