Also visit www.atgnews.com
करोना: सीबीएसई बोर्डाची विशेष हेल्पलाइन
नवी दिल्ली: करोना विषाणूच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर बोर्ड परीक्षा स्थगित केल्यानंतर आता बोर्डाने एक हेल्पलाइन क्रमांक जारी केला आहे. हा क्रमांक टोल फ्री आहे. म्हणजेच या क्रमांकावर फोन लावल्यास कोणतंही शुल्क आकारलं जाणार नाही. ही हेल्पलाइन बोर्डाने विशेष करून विद्यार्थ्यांची सुरक्षा आणि जनजागृतीसाठी सुरू केली आहे. यासंदर्भात सीबीएसईने एक नोटीस जारी केली आहे. यात म्हटलं आहे की करोना व्हायरस महामारीबद्दल विद्यार्थ्यांना जागरुक करण्यासाठी बोर्ड ही हेल्पलाइन सुरू करत आहे. या क्रमांकावर फोन करून विद्यार्थी करोनासंदर्भातले कोणतेही प्रश्न विचारू शकतात. कोणती समस्या असेल तर त्याचं उत्तर शोधू शकतात. या हेल्पलाइनचा फायदा पालकही घेऊ शकतात. हा हेल्पलाइन क्रमांक आहे - १८००११८००४. हा क्रमांक ३१ मार्च २०२० पर्यंत दररोज सकाळी ८ वाजल्यापासून रात्री ८ वाजेपर्यंत सक्रीय राहणार आहे. या कालावधीत या क्रमांकावर फोन करून विद्यार्थी, पालक मार्गदर्शन घेऊ शकणार आहेत. या हेल्पलाइन क्रमांकाद्वारे विद्यार्थ्यांना घरी रिकाम्या वेळात काहीतरी वेगळं आणि चांगलं करण्याच्या टीप्सही एक्सपर्ट्स देणार आहेत. दरम्यान, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सीबीएसईने दहावी आणि बारावीच्या परीक्षाही तूर्त स्थगित केल्या आहेत. १९ मार्च ते ३१ मार्चमधील परीक्षा लांबणीवर टाकल्या आहेत. ज्या परीक्षा संपल्या आहेत, त्यांची उत्तरपत्रिका तपासणीदेखील तूर्त स्थगित करण्यात आली आहेत.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2QBxMwF
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments