CBSE बोर्डाचं परीक्षांबाबत 'हे' स्पष्टीकरण

नवी दिल्ली: देशभरात करोना विषाणूचा फैलाव वाढत आहे. आतापर्यंत १७ मार्चपर्यंत देशभरात १२५ जणांना करोनाची लागण झाली असल्याचे आढळून आले आहे. बहुतांश सर्व राज्यांनी शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. पण बोर्डाच्या परीक्षा सुरूच आहेत. विद्यार्थी-पालकांकडून परीक्षा रद्द करण्याची मागणी होत आहे. या पार्श्वभूमीवर सीबीएसई बोर्डाने ट्विटरवरून स्पष्टीकरण दिले आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसई बोर्डाने परीक्षा स्थगित केलेली नाही. मात्र काही विद्यार्थी आणि पालकांनी ही परीक्षा रद्द करावी अशी मागणी केली आहे. पण सीबीएसईने स्पष्टीकरण दिले आहे. 'बोर्ड परीक्षा धोरणांच्या आधारे सक्षम अधिकाऱ्यांमार्फत घेतल्या जातात. हे दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांच्या हिताचे आहे. संसर्ग टाळण्यासाठी सर्व परीक्षा केंद्रांवर आवश्यक ती सर्व खबरदारी घेतली जात आहे.' दिल्लीच्या ईशान्य भागातील परीक्षाही हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर पुढे ढकलण्यात आल्या होत्या. त्यादेखील या दरम्यान होणार होत्या पण आता या परीक्षा १४ एप्रिलला संपणार आहेत.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/38TcxfZ
via IFTTT

Post a Comment

0 Comments