Also visit www.atgnews.com
विद्यापीठांची स्वायत्तता कायम राखा; राज्यपालांचे CM ना पत्र
> मंगेश इंदापवार, नागपूर राज्यातील सर्व विद्यापीठे आणि अनुदानित संस्थांमधील मार्च महिन्यापर्यंत शिल्लक राहिलेली रक्कम तात्काळ उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या खात्यात करण्यासंदर्भात उच्च व तंत्रशिक्षण विभागाने दिलेल्या आदेशावर कुलपती व राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी आश्चर्य व्यक्त केले असून विद्यापीठांची स्वायत्तता कायम राखावी असे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिले आहे उच्च व तंत्रशिक्षण विभागाने आदेशाद्वारे राज्यातील सर्व विद्यापीठे आणि अनुदानित शिक्षण संस्थांमधील बँक खातात शिल्लक असलेले रक्कम आणि रूसाअंतर्गत जमा केलेल्या रकमेतील शिल्लक राज्य सरकारच्या तिजोरीत जमा करण्याचे आदेश दिलेत. या संदर्भात बातम्या प्रकाशित झाल्या होत्या. त्या बातम्यांची दखल घेत कुलपती व राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून आदेशाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. राज्य सरकारचा सदर आदेश हा विद्यापीठांच्या स्वायत्तेवर गदा आणणारा आहे, या आदेशाला मागे घेण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी योग्य कारवाई करावी,असे पत्रात नमूद केले आहे. महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायद्यात विद्यापीठांना पूर्ण स्वायत्तता प्रदान केली आहे. त्यात आर्थिक स्वायत्तेचा देखील समावेश आहे. राज्य सरकारला अशाप्रकारे विद्यापीठांकडून पैसे मागण्याचा अधिकार नाही. केवळ विद्यापीठांच्या आर्थिक व्यवहारांबाबत चौकशी करण्याचा त्यावर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार आहे. परंतु विद्यापीठांच्या बँक खात्यांमध्ये गुंतवण्यात आलेली कोणतीही रक्कम सरकारला मागण्याचा अधिकार नाही. राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच अशा प्रकारचे आदेश देण्यात आले आहे. यासंदर्भात राज्यातील कुलगुरूंनी आधीच तीव्र नाराजी व्यक्त केली होती. मुंबई पुणे नागपूर औरंगाबाद मोठ्या विद्यापीठांच्या तिजोरीमध्ये किमान दोनशे ते हजार कोटी रुपये आहेत. सरकारच्या आदेशाचे पालन केल्यास संपूर्ण रक्कम सरकारकडे जमा करावी लागणार आहे. परंतु त्यामुळे विद्यापीठ आर्थिक संकटात येतील. दरम्यान, राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रामुळे विद्यापीठांना थोडा दिलासा मिळाला आहे. सरकार आदेश मागे घेईल अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2QHKSIP
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments