Also visit www.atgnews.com
JEE Main परीक्षा मेच्या अखेरच्या आठवड्यात
परीक्षा यावर्षीच्या मे महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात होणार आहे. याबाबतची सूचना मंगळवारी जारी करण्यात आलेल्या एका अधिकृत निवेदनात देण्यात आली आहे. व्हायरसच्या पार्श्वभूमीवर ही परीक्षा स्थगित झाली आहे. ही परीक्षा नेमकी कधी होणार याबाबतची माहिती येत्या काही आठवड्यात परिस्थितीचा अंदाज घेऊन करण्यात येईल, असं नॅशनल टेस्ट एजन्सी अर्थात NTA ने कळवलं आहे. सर्व परीक्षा स्थगित केल्याची घोषणा एनटीएने सोमवारी केली होती. त्याच्या दुसऱ्याच दिवशी एनटीएने JEE Main च्या तारखेसंदर्भातली माहिती दिली आहे. ही परीक्षा लांबणीवर टाकल्याची घोषणी एनटीएने १८ मार्च रोजी केली होती. करोनाच्या पार्श्वभूमीवर ही परीक्षा लांबणीवर टाकण्याचा निर्णय संस्थेने २० दिवस आधी घेतला. तेव्हा लॉकडाऊनचीदेखील घोषणा झाली नव्हती. मात्र देशभरात या व्हायरसच्या संसर्गाचे परिणाम दिसत होते. JEE Main च्या प्रस्तावित शेड्युलनुसार १५ एप्रिलला अॅडमिट कार्ड मिळणार आहेत. एनटीएच्या परिपत्रकानुसार, नियोजित वेळापत्रकानुसार १५ एप्रिल रोजी अॅडमिट कार्ड मिळतील. मात्र परिस्थितीवर लक्ष ठेवून त्याप्रमाणे आवश्यक त्या सूचना दिल्या जाणार आहेत. ही जेईई मेन परीक्षा ५,७,९ आणि ११ एप्रिल रोजी होणार होती. करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर ती पुढे ढकलण्यात आली.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3awIiNz
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments