Also visit www.atgnews.com
SSC CGL: सीजीएल टियर १ परीक्षेचा निकाल जाहीर; 'या' लिंकने तपासा
SSC CGL Tier 1 Result 2020: एसएससी सीजीएल टियर 1 निकाल २०२० ची प्रतीक्षा करणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची घोषणा आहे. कर्मचारी निवड आयोगाने (SSC) ने संयुक्त पदवी स्तरीय परीक्षा (CGLE) 2020 च्या पहिल्या टप्प्यातील म्हणजेच टीअर १ परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. आयोगाद्वारे एसएससी सीजीएल टियर 1 निकालाची घोषणा २६ नोव्हेंबर २०२१ रोजी करण्यात आली आहे. यासह आयोगाने टियर १ मध्ये यशस्वी झालेल्या आणि टियर २ साठी पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या नावांची यादी देखील जारी केली आहे. ज्या उमेदवारांनी कंबाईंड ग्रॅज्युएट लेवल एक्झामिनेशन २०२० टियर १ परीक्षा दिली होती, ते आपला रोल नंबर पात्र उमेदवारांच्या यादीत पाहू शकता. ही यादी आयोगाच्या अधिकृत वेबसाइटवर पाहता येईल. या वृत्तातही या संकेतस्थळाची थेट लिंक देण्यात आली आहे. कर्मचारी निवड आयोगाद्वारे संयुक्त पदवी स्तरीय परीक्षा (CGLE) 2020 च्या टियर 1 परीक्षेचे आयोजन १३ ऑगस्ट ते २४ ऑगस्ट पर्यंत कॉम्प्युटर बेस्ड पद्धतीने करण्यात आलं होतं. परीक्षेसाठी अधिसूचना २९ डिसेंबर २०२० रोजी जारी झाली होती आणि अर्ज प्रक्रिया ३१ जानेवारी २०२१ पर्यंत सुरू होती. पुढील पद्धतीने पाहा आपला रोल नंबर सीजीएल टियर 1 निकाल २०२०२ मध्ये आपला रोल नंबर पाहण्यासाठी उमेदवारांनी आयोगाच्या वेबसाइटवर गेल्यावर होमपेजवर दिलेल्या रिझल्ट्स लिंक वर क्लिक करावे. आता नव्या पेच वर सीजीएल परीक्षेच्या टॅब वर क्लिक करा. नंतर नव्या पेजवर २६ नोव्हेंबर २०२१ तारखेसह दिलेल्या तीन वेगवेगळ्या लिंकवर तीन वेगवेगळ्या लिंकवर आळीपाळीने क्लिक करून ओपन झालेल्या पीडीएफ फाईलमध्ये उमेदवारांनी आपला रोल नंबर आणि नाव सर्च (Ctrl+F) करू शकतील.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3p5hoF2
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments