फ्री ऑनलाइन कोर्ससाठी AICTE चं नवं पोर्टल

नवी दिल्ली: करोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण देश लॉकडाऊन स्थितीत आहे. लोक घरात अडकून पडले आहेत आणि पर्यायाने जे वर्क फ्रॉम होम करत नाहीत, अशा लोकांकडे रिकामा वेळ भरपूर आहे. म्हणूनच असे लोक स्वत:ला स्मार्ट आणि टॅलेंटेड बनू शकता. अनेक सरकारी कंपन्यांसह अनेक खासगी कंपन्याही यासाठी प्रयत्न करत आहेत. काही कंपन्या आपले शॉर्ट टर्म स्कील कोर्सेस मोफत ऑफर करत आहेत. अशा कोर्सेसची एरव्ही फी २० हजार रुपयांपर्यंत असते. कुठे करता येतील हे कोर्सेस? ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन () ने एक नवा ई-लर्निंग पोर्टल लॉन्च केलं आहे. या पोर्टलचं नाव आहे एलिस () म्हणजेच एनहान्समेंट इन लर्निंग विथ इम्प्रूव्हमेंट इन स्कील्स. एआयसीटीईचे अध्यक्ष प्रा. अनिल सहस्त्रबुद्धे, उपाध्यक्ष एम. पी. पुनिया आणि सदस्य सचिव राजीव कुमार यांनी रविवारी हे पोर्टल लाँच केलं. या संदर्भात एआयसीटीईने जाहीरात देखील जारी केली आहे. या जाहिरातीत असं म्हटलंय की, 'अनेक कंपन्या ELIS पोर्टलवर ई-लर्निंग कंटेंट आणि शॉर्ट टर्म कोर्सेस मोफत देण्यासाठी पुढे आल्या आहेत. येथे विद्यार्थ्यांना त्यांच्या नियमित विषयांसाठी मोफत स्टडी मटेरियल्स तर मिळतीलच, शिवाय जॉ़ब प्रोफाइल अधिक चांगली करण्यासाठी स्कील एनहान्समेंट कोर्सेसचा पर्यायही मिळणार आहे.' AICTE ने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत ELIS वर १८ प्रगतीशील कंपन्यांनी २६ विविध प्रकारच्या कोर्सचे पर्याय दिले आहेत. एरव्ही याच कोर्सेससाठी या कंपन्या ५ हजारांपासून २० हजार रुपयांपर्यंतचे शुल्क आकारतात. पण आता हे अभ्यासक्रम मोफत दिले जात आहेत. मोफत कोर्सेससाठी नोंदणी कशी कराल? AICTE ने आपल्या जाहिरातीत सांगितलं आहे की कंपन्यांचे हे मोफत अभ्यासक्रम आणि ई-कंटेंटची ऑफर केवळ लॉकडाऊन कालावधीपर्यंतच आहे. तुम्ही १५ मे २०२० पर्यंत या फ्री कोर्सेससाठी नोंदणी करू शकतात. यादरम्यान रजिस्टर करणाऱ्या विद्यार्थ्यांना कोर्स संपेपर्यंत फी द्यावी लागणार नाही. रजिस्टर करण्यासाठी तुम्हाला ELIS पोर्टल वर जावं लागेल. या पोर्टलची लिंक AICTE च्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. AICTE च्या वेबसाइटवर जाण्यासाठी थेट ELIS पोर्टलवर जाण्यासाठी


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2wz8AA4
via IFTTT

Post a Comment

0 Comments