आयटीआयच्या विद्यार्थ्यांना यूट्यूबद्वारे धडे!

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये () विद्यार्थ्यांना घरबसल्या अभ्यास सुरू ठेवण्यासाठी यूट्यूब वाहिनीच्या माध्यमातून मार्गदर्शन वर्ग सुरू करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे प्राध्यापकांनी रोज दोन तास ऑनलाइन व्याख्याने आणि परीक्षा घ्याव्यात, अशा सूचनाही व्यवसाय प्रशिक्षण विभागाने दिल्या आहेत. व्यवसाय प्रशिक्षण विभागाच्या 'लर्निग मॅनेजमेंट इन्फर्मेशन सिस्टम'च्या माध्यमातून अभ्यास साहित्य निर्माण केले आहे. 'वर्कशॉप कॅल्क्युलेशन', 'वर्कशॉप सायन्स', 'इंजिनीअरिंग ड्रॉईंग', 'एम्प्लॉयबिलिटी स्किल्स', 'फिटर', 'टर्नर' या विषयांचे अभ्यासक्रम ऑनलाइन उपलब्ध झाले आहेत. शिक्षकांनी त्याचा वापर करून आणि व्हिडीओ कॉलिंग प्रणालींच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांच्या परीक्षाही घ्याव्यात, अशा सूचना संचालनालयाने दिल्या आहेत. त्याचप्रमाणे विभागाने यूट्यूब वाहिनी तयार केली असून त्यावरही विविध विषयांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मिळणार आहे. औद्योगिक प्रशिक्षण संस्थांनी प्रत्येक विषयांचे रोज किमान दोन तास ऑनलाइन वर्ग भरवणे संचालनालयाने बंधनकारक केले आहे. त्यामुळे पारंपरिक आणि तंत्रशिक्षण अभ्यासक्रमाच्या कॉलेजांप्रमाणेच आयटीआयमधील विद्यार्थ्यांचा थांबलेला अभ्यास आता सुरू झाला आहे. आयटीआयच्या विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिके आणि सैद्धांतिक विषयांचे मार्गदर्शनही ऑनलाइन मिळणार आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2yVEoAd
via IFTTT

Post a Comment

0 Comments