Also visit www.atgnews.com
सीबीएसई: अकरावीत यंदापासून 'हा' नवा विषय
नवी दिल्ली: सीबीएसई बोर्ड इयत्ता अकरावीला एक नवीन विषय आणणार आहे. यावर्षी सीबीएसई ११ वीत 'अप्लाइन मॅथेमॅटिक्स' नावाचा एक नवा विषय येणार आहे. सीबीएसईद्वारे जारी केलेल्या परिपत्रकात ही माहिती देण्यात आली आहे. 'या विषयाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रातील मुलभूत आणि सांख्यिकीय उपकरण आणि त्यांच्या वापराचं आकलन होण्यास मदत होईल. ज्या विद्यार्थ्यांना दहावीत बेसिक मॅथ्स होता, ते सिनीअर सेकंडरी स्तरापर्यंत अप्लाइड मॅथेमॅटिक्स हा विषय अभ्यासू शकतील,' असं या परिपत्रकात म्हटलं आहे. अकरावीत हा विषय केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री डॉ. रमेश पोखरियाल 'निशंक' यांच्या सूचनेवरून समाविष्ट केला आहे. डॉ. पोखरियाल यांनी यासंदर्भात ट्विटही केले आहे. मॅथेमॅटिक्स आणि अप्लाइड मॅथेमॅटिक्समध्ये काय फरक आहे? बारावीपर्यंत असलेला मॅथेमॅटिक्स विषय त्या विद्यार्थ्यांना उपयोगी ठरतो, जे पदवी स्तरावर मॅथेमॅटिक्स / फिजिकल सायंसेस / इंजिनीअरिंगचा अभ्यास करू इच्छितात. अप्लाइड मॅथेमॅटिक्स त्या विद्यार्थ्यांसाठी आहे, जे गणित शिकून आणि समजून पुढे त्याचा वापर करू इच्छितात. हा विषय गणिती वापरावर केंद्रित करण्यात आला आहे. मॅथेमॅटिक्स आणि अप्लाइड मॅथेमॅटिक्स या दोघांपैकी एकाचीच निवड विद्यार्थ्यांना अकरावीला करता येणार आहे. मॅथेमॅटिक्सचा सब्जेक्ट कोड ०४१ तर अप्लाइड मॅथेमॅटिक्सचा सब्जेक्ट कोड २४१ आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2UysFj9
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments