मुलांना घरी रमवतील हे एज्यु-अॅप्स!

लॉकडाऊनलाचा अर्धाअधिक काळ संपला आहे. आधी मुलांनी या लॉकडाऊन आणि रद्द झालेल्या परीक्षांमुळे वगैरे खूप धम्माल केली. पण आता हळूहळू दिवस सरताहेत तसतसं मुलं कंटाळू लागली आहेत. पण हातातल्या मोबाइलला मात्र अजून तितकी कंटाळलेली नाहीत बरं. म्हणूनच या मोबाइलमध्येच डोकावून काही एज्युकेशन अॅप्स आपण या मुलांना नक्की देऊ शकतो. पाहूयात कोणते असे आहेत, ज्यामुळे मुलांच्या ज्ञानातही भर पडेल आणि त्यांचा वेळही छान जाईल. ड्रॅगन बॉक्स हे लर्निंग अॅप भाषा शिकवतं. यात कुठलेच छुपे चार्जेच नाही. तुम्हाला काही खरेदी करायचं असेल तर ते तुमच्या इच्छेवर आहे. यात मुलांना खूप शिकायला मिळतं. क्विक मॅथ नावावरूनच कळतं ही हे गणिताशी संबंधित आहे. मुलांमध्ये गणिताची गोडी लावणारं हे अॅप आहे. यात गणितं सोडवायला मिळतात. मुलांची गणिताची गोडी वाढवायला हे छान अॅप आहे. सायंन्स ३६० या अॅपमध्ये सायन्स इंजिनीअरिंग, अॅडव्हान्स्ड सायन्स आदी माहिती मुलांना मिळते. या नॅशनल सायन्स फाउंडेशनने बनवलं आहे. या अॅपमध्ये दिलेलं कंटेन्ट दर आठवड्याला अपडेट होतं. याची क्वालिटी चांगली आहे. ३६० डिग्री इमेजेसमुळे मुलांना वैज्ञानिक समस्या समजायला मदत होते. iSLCollective यात मुलांना घरच्या घरी सोडवायला वर्कशीट दिलेली असते. याची प्रिंटही काढून मुलांना सोडवायला देता येऊ शकते. ही वर्कशीट पूर्णपणे फ्री असते. डाऊनलोड करण्यासाठी कोणतंही शुल्क द्यावं लागत नाही.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/341Xujo
via IFTTT

Post a Comment

0 Comments