Also visit www.atgnews.com
शैक्षणिक सत्र 'या' महिन्यात सुरू करा: यूजीसीची शिफारस
करोना व्हायरस आणि लॉकडाऊनमुळे बोर्डाच्या परीक्षांसह सर्व प्रवेश स्थगित आहेत. वेळ निघून जात आहे आणि विद्यार्थी अस्वस्थ आहेत. परीक्षा कधी होणार, प्रवेश कधी होणार, नवं शैक्षणिक वर्ष कधीपासून सुरू होणार? या प्रश्नांनी भंडावून सोडलं आहे, या प्रश्नांची उत्तरं आता सध्या कोणाकडेच नाहीत. या समस्यांवर मार्ग काढण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) ने दोन वेगवेगळ्या समित्या बनवल्या आहेत. एक समिती हरयाणा विद्यापीठाचे कुलगुरू आर.सी. कुहाड यांच्या अध्यक्षतेखाली तयार करण्यात आली आहे. या समितीला लॉकडाऊनदरम्यान विद्यापीठांच्या परीक्षा घेण्यासाठी उपाय शोधणं आणि वैकल्पिक अॅकेडमिक कॅलेंडर तयार करणं अशी जबाबदारी आहे. दुसरी समिती इग्नूचे कुलगुरू नागेश्वर राव यांच्या अध्यक्षतेखाली तयार करण्यात आली आहे. या समितीला ऑनलाइन एज्युकेशनचा स्तर वाढवण्याचे उपाय सुचवण्याचं काम देण्यात आलं आहे. दोन्ही समित्यांनी आपापले अहवाल यूजीसीला दिले आहेत. यापैकी एका समितीने सुचवलं आहे की विद्यापीठांनी यावेळी आपलं शैक्षणिक सत्र जुलैऐवजी सप्टेंबरमध्ये सुरू करावं. ज्या विद्यापीठांकडे योग्य ती साधने आहेत त्यांनी आपल्या परीक्षा ऑनलाइन घ्याव्यात असाही सल्ला समितीने दिला आहे. पण जर साधने नसतील तर लॉकडाऊनपर्यंत वाट पाहण्याचीही शिफारस केली आहे. त्यानंतर वेळापत्रक काढून परीक्षा घेतल्या जाऊ शकतात, अशी या समितीची सूचना आहे. यासंदर्भात केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचे एक अधिकारी म्हणाले की दोन्ही अहवालात दिलेल्या शिफारशींची समीक्षा केली जाईल. त्यानंतर सरकार पुढील निर्देश देईल. देशभरात शाळा, महाविद्यालये १६ मार्च २०२० पासून बंद आहेत. करोना व्हायरसच्या संसर्गामुळे खबरदारी म्हणून सर्व वर्ग बंद करण्यात आले आहेत. ते कधी सुरु होणार, याबाबत आता तरी कोणतीच माहिती नाही.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3bDvKVo
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments