Also visit www.atgnews.com
जीआरई, टोफेल परीक्षा घरूनच देता येणार
करोना व्हायरसच्या संक्रमणाचं संकट संपूर्ण जगासमोर आ वासून उभं आहे. अनेक परीक्षा रद्द झाल्या आहेत किंवा लॉकडाऊन स्थितीमुळे लांबणीवर पडल्या आहेत. चीन आणि इराण वगळता अन्य देशांचे विद्यार्थी आता टोफेल आणि जीआरई सारख्या परीक्षा घरी बसूनच देऊ शकणार आहेत. एज्युकेशन टेस्टिंग सर्व्हिसने ही माहिती दिली आहे. करोनामुळे जगभर या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. टोफेलचे कार्यकारी संचालक श्रीकांत गोपाल यांनी पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, जगभरात करोना व्हायरसच्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर जीआरई आणि टोफेल या परीक्षांसदर्भात विद्यार्थांना दिलासा देण्यात आला आहे. परीक्षा केंद्रांवर परीक्षा आयोजित करण्यासारखी स्थिती नसल्याने टोफेल आणि जीआरई परीक्षा विद्यार्थ्यांना घरूनच देण्याची मुभा देण्यात आली आहे. त्यांनी सांगितले की परीक्षा घरूनच देण्याची मुभा देण्यात आली असली तरी विश्वसनीयता आणि सुरक्षेच्या सर्व मानदंडांची काळजी घेतली जाईल.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/39Gwx63
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments