Also visit www.atgnews.com
लॉकडाऊनमध्ये 'या' प्रकारची नोकरी सर्चमध्ये टॉपवर
संपूर्ण भारत १४ एप्रिलपर्यंत स्थितीत आहे. करोना व्हायरसच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे. देशाच्या आर्थिक स्थितीवर यामुळे खूप मोठा परिणाम झाला आहे. अनेकांच्या नोकऱ्यांवर गदा आली आहे. काही जणांना तर कंपन्यांनी बिनपगारी रजेवर पाठवले आहे. एका रिसर्चमधून अशी माहिती पुढे आली आहे की लोक म्हणजेच घरून करता येण्यासारख्या नोकऱ्यांच्या शोधात आहेत. पण अशा घरून करता येण्यासारख्या नोकऱ्यांमध्ये वाढ मात्र झालेली नाही. या कालावधीत या प्रकारच्या नोकऱ्यांची संख्या तितकीच आहे, जितकी आधी होती, अशी माहितीही या अभ्यासातून पुढे आली आहे. नोकऱ्यांच्या शोधात २५० टक्के वाढ वर्क फ्रॉम होम करता येईल अशा नोकऱ्यांमध्ये २५० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. बहुतांश लोक ऑनलाइन अशा प्रकारच्या शोधत आहेत. का शोधत आहेत लोक अशा नोकऱ्या? संपूर्ण देशात लॉकडाऊन आहे. सर्व कंपन्या बंद आहेत. जेथे शक्य तेथे लोक घरून काम करत आहेत. देशाच्या आर्थिक घडीवर यामुळे खूप मोठा परिणाम होत आहे आणि भविष्यातही तो काही काळ तसाच राहण्याची शक्यता आहे. अशा वेळी हा मार्च-एप्रिलचा काळ सुरू असल्याने अनेक लोकांना नोकरकपातीची भीती वाटत आहे. परिणामी नोकऱ्यांचा शोध सुरू आहे. वर्क फ्रॉम होमला प्राधान्य देणारी कंपनी असल्यास सध्याच्या काळात उत्पन्न सुरू राहील, असं वाटूनही लोक या प्रकारच्या नोकऱ्या शोधत आहेत.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3aGa1vn
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments