कलमापन चाचणी: विद्यार्थ्यांचा ओढा युनिफॉर्म सर्व्हिसेसकडे

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई दहावीच्या विद्यार्थ्यांनी दिलेल्या कलमापन व अभिक्षमता चाचणीचा निकाल जाहीर करण्यात आला असून, सर्वाधिक (१९.३ टक्‍के) विद्यार्थ्यांचा ओढा गणवेशधारी सेवांकडे (युनिफॉर्म सर्व्हिसेस) असल्याचे या निकालातून स्पष्ट होत आहे. १७.७ टक्‍के विद्यार्थ्यांचा कल हा ललित कला क्षेत्राकडे असल्याचे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीतून समोर आले आहे. राज्यातील २२ हजार ४८८ शाळांमधून इयत्ता दहावीच्या १५ लाख, ७६ हजार, ९२६ विाद्यार्थ्यांची कल अभिक्षमता चाचणी मोबाइल आणि कम्प्युरच्या माध्यमातून घेण्यात आली होती. कृषी, कला-मानव्यविद्या, वाणिज्य, ललित कला, आरोग्य व जैविक विज्ञान, तांत्रिक आणि गणवेशधारी सेवा या सात क्षेत्रांतील विद्यार्थ्यांचे कल जाणून घेण्यात आले. यात २० टक्‍के मुलांनी पहिले प्राधान्य गणवेशधारी सेवांना दिले आहे; तर १९.८ मुलींनी पहिले प्राधान्य ललित कला या क्षेत्राला दिले आहे. १६.८ विद्यार्थ्यांनी वाणिज्य क्षेत्रास दुसरा प्राधान्य कल दिला आहे. १६.१ मुलींची तांत्रिक आणि १६ टक्‍के वाणिज्य ही दुसरी प्राधान्य कल असलेली क्षेत्रे आहेत. राज्यातील ९ विभागांपैकी ६ विभागांमध्ये गणवेशधारी सेवा आणि २ विभागांमध्ये ललित कला या क्षेत्राला पहिले प्राधान्य दिले गेले आहे. महाराष्ट्रातील ९ पैकी ८ विभागांमध्ये वाणिज्य या क्षेत्राला सर्वाधिक दुसऱ्या क्रमांकाचा प्राधान्य कल दिसून येत आहे, अशी माहिती राज्य शिक्षण मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी दिली. विद्यार्थ्यांनो, आज पाहा निकाल कलमापन चाचणीबरोबरच कल अभिक्षमता चाचणीचा निकाल आज, शुक्रवारी १ मे रोजी या पोर्टलवर दुपारी १ वाजल्यापासून उपलब्ध आहे. अभिक्षमता चाचणी भाषिक, तार्किक, अवकाशीय, सांख्यिकीय अशा चार क्षेत्रांसाठी घेण्यात आली. विद्यार्थ्यांना निकालापूर्वी पुरेसा अवधी मिळावा, ज्याद्वारे पुढील करिअर आणि प्रवेश प्रक्रियेसंदर्भात एक योग्य पर्याय निवडण्यासाठी विचार करता येईल, असेही राज्य शिक्षण मंडळाने सांगितले आहे. विद्यार्थ्यांचे कल गणवेशधारी सेवा : १९.३ टक्‍के ललित कला : १७.६ टक्‍के वाणिज्य : १६.६ टक्‍के कृषी : १३.५ टक्‍के कला-मानव्यविद्या : १२ टक्‍के आरोग्य व जैविक विज्ञान : १०.९ टक्‍के तांत्रिक : ९.२ टक्‍के हेही वाचा :


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/35lAsod
via IFTTT

Post a Comment

0 Comments