Also visit www.atgnews.com
कंपनी सेक्रेटरी पदाची परीक्षा लांबणीवर
कंपनी सेक्रेटरी (सीएस) पदाची जूनमध्ये घेण्यात येणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचे इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरी ऑफ इंडियाने (आयसीएसआय) गुरुवारी स्पष्ट केले. या परीक्षेला देशभरातून सुमारे एक लाख विद्यार्थी बसले आहेत. करोना या संसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. खबरदारीचा उपाय म्हणून सुरू असलेले लॉकडाउन सुरू राहणार की संपणार याबाबतही निश्चिती नाही. त्यामुळे अनेक परीक्षा पुढे ढकलण्याची वेळ विविध शैक्षणिक प्राधिकरणांवर आली आहे. त्यात कंपनी सेक्रेटरी पदाच्या जूनमध्ये नियोजित वेळापत्रकाप्रमाणे होणाऱ्या परीक्षाही पुढे ढकलण्यात आल्या आहेत. १ जून ते १० जून दरम्यान या परीक्षा होणार होत्या. लॉकडाउन असतानाही विद्यार्थ्यांनी परीक्षा अर्ज भरले होते. कंपनी सेक्रेटरी पदाच्या परीक्षा तीन टप्प्यांत घेण्यात येतात. यामध्ये फाऊंडेशन, एग्झिक्युटिव्ह आणि प्रोफेशनलचा समावेश आहे. आयसीएसआय मे-जून परीक्षेचे वेळापत्रक काही विद्यार्थ्यांना दिले होते. मात्र, परिस्थितीचा विचार करत या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. नव्या वेळापत्रकाप्रमाणे ही परीक्षा आता ६ जुलैपासून घेण्यात येतील, असे सूत्रांनी सांगितले. तर परीक्षेचे नवीन वेळापत्रक ललवकरच जाहीर करण्यात येईल असे इन्स्टिट्यूटचे सचिव अशोक कुमार दीक्षित यांनी काढलेल्या परिपत्रकात म्हटले आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2YqN1x9
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments