फ्रान्समध्ये उच्च शिक्षणासाठी स्कॉलरशीपची संधी

फ्रान्समध्ये मास्टर्स डिग्री लेवलवर शिक्षणासाठी भारतीय विद्यार्थ्यांना चारपक मिळत आहे. या स्कॉलरशीप अंतर्गत विद्यार्थ्यांना काय लाभ मिळतील, कसा करायचा अर्ज? जाणून घ्या... लाभ ७०० युरो म्हणजेच सुमारे ६० हजार रुपये लिव्हिंग अलाउन्स स्टुडंट व्हिसा आणि फ्रान्समध्ये प्रवेश मार्गदर्शन शुल्क माफ ५००० युरोपर्यंत ट्युशन शुल्क माफ विद्यार्थ्यांना स्वस्त दरातील घर शोधण्यास सहकार्य ट्रॅव्हल ग्रान्ट भारताहून फ्रान्सला इकॉनॉमी क्लास वन वे एअर तिकीट स्टुडंट व्हिसा आणि फ्रान्समध्ये प्रवेश मार्गदर्शन शुल्क माफ सोशल सिक्युरिटी पात्रता अर्जदार भारताचा नागरिक असणं अनिवार्य आहे. तो सद्यस्थितीत भारतात राहणारा/राहणारी हवीय अर्जदाराचं वय कमाल ३० वर्षे असावे अर्जदार भारतात संस्थेत प्रवेश घेतलेला असावा किंवा तरुण व्यावसायिक असावा जो एखाद्या कंपनी अर्ज करण्याच्या तारखेच्या आधी तीन वर्षांपेक्षा जास्त काम करत नसावा. या स्कॉलरशीपसाठी फ्रान्समध्ये एखादा कोर्स करणं अनिवार्य आहे. फ्रान्सच्या उच्च शिक्षण संस्थेत प्रवेश घ्यायला हवा. जर एक किंवा अधिक सेमिस्टर इतर कुठल्या देशातून केली तर तेवढ्या अवधीची स्कॉलरशीप मिळणार नाही. अर्ज कसा करायचा? विद्यार्थांना ऑनलाइन स्कॉलरशीप पोर्टल https://ift.tt/2P1RalE वर अर्ज करावा लागेल. पुढील कागदपत्रे आवश्यक आहेत - - पासपोर्ट साइज फोटोग्राफ - आपल्या पासपोर्टच्या पहिल्या पानाची स्कॅन केलेली कॉपी. जर डेडलाइननंतर अॅप्लिकेशन मिळालं तर पासपोर्ट अॅप्लिकेशनचं प्रूफ जोडावा. - संपूर्ण सीवी (जास्तीत जास्त दोन पाने) - फ्रान्सच्या एखाद्या उच्च शिक्षण संस्थेत प्रवेश घेतल्याचं प्रमाणपत्र वा स्वीकारपत्राची स्कॅन केलेली कॉपी. डेडलाइनच्या आधी नाही मिळाली तर ईमेलद्वारे जमा करावी. - बारावी, पदवी आणि पदव्युत्तर पदवीची प्रमाणित केलेली स्कॅन कॉपी. - फ्रेंच लॅंग्वेज सर्टिफिकेट - १२वीची गुणत्रिका आणि डिग्री/पासिंग सर्टिफिकेट - यूनिवर्सिटी ची मार्कशीट आणि डिग्री - नोकरी/इंटर्नशिपची कागदपत्रे असल्यास - यूनिवर्सिटीकडून परवानगी पत्र


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/39AAmtE
via IFTTT

Post a Comment

0 Comments