विद्यापीठ परीक्षा होणार, उच्च तंत्र शिक्षण मंत्र्यांचा पुनरुच्चार

मुंबई: राज्यातील विद्यापीठे आणि संलग्न महाविद्यालयांच्या परीक्षांसदर्भातील चित्र येत्या आठ ते दहा दिवसांत स्पष्ट होईल, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिली. विद्यार्थ्यांचे कोणत्याही प्रकारचे नुकसान होणार नाही, याची हमी सामंत यांनी यावेळी दिली. लॉकडाऊन संपल्यानंतर विद्यार्थ्यांना पुरेसा वेळ दिला जाईल आणि त्यानंतरच परीक्षा होतील. मात्र परीक्षा होणार हे नक्की. तेव्हा विद्यार्थ्यांनी कोणताही संभ्रम मनात ठेवू नका आणि कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, असं आवाहन सामंत यांनी केलं. परीक्षांसंदर्भात विद्यापीठ अनुदान आयोगाने दोन समित्या नेमल्या आहेत. त्यांचे अहवाल केंद्र सरकारला सुपूर्द करण्यात आले आहेत. येत्या ३-४ दिवसांत त्या अहवालांमधील शिफारशींच्या अनुषंगाने आम्हाला पुढील सूचना दिल्या जातील. त्यानुसार येत्या आठ ते दहा दिवसांत राज्यातील परीक्षांसंदर्भातील चित्र स्पष्ट होईल, असं त्यांनी सांगितलं. लॉकडाऊनचा दुसरा टप्पा ३ मेपर्यंत आहे. त्यानंतर लॉकडाऊन वाढवला जाणार की नाही याबाबतचं चित्रही येत्या २-३ दिवसात स्पष्ट होणार आहे. मात्र लॉकडाऊन वाढला किंवा नाही वाढला तरी ३० मेच्या आत परीक्षा होण्याची शक्यता मात्र सामंत यांनी फेटाळली. ते म्हणाले, 'लॉकडाऊन संपला तरी विद्यार्थ्यांना तयारीसाठी पुरेसा वेळ द्यावा लागणार आहे. त्यामुळे ३० मेच्या आत परीक्षा होतील की नाही, याची खात्री देता येत नाही.' ऑनलाइन परीक्षांबाबतही त्यांनी माहिती दिली. विद्यापीठाच्या परीक्षा आता करोना विषाणूच्या संसर्गाच्या भीतीमुळे ऑनलाइनच होतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र राज्याच्या अनेक दुर्गम भागात तंत्रज्ञानविषयक सोयीसुविधा नाहीत. त्यामुळे परीक्षांचा विभागवार विचार करावा लागेल, असं ते म्हणाले. हेही वाचा:


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2xjzZGL
via IFTTT

Post a Comment

0 Comments