Also visit www.atgnews.com
आयसीएआयचे मोफत शॉर्ट टर्म ऑनलाइन कोर्स
तुम्ही अनेक शॉर्ट टर्म ऑनलाईन कोर्स करून लॉकडाउनमध्ये मिळालेल्या मोकळ्या वेळेचा सदुपयोग करून घेऊ शकता. यासाठी अनेक संस्था उद्योगांच्या मागणीनुसार अभ्यासक्रम ऑफर करीत आहेत. आता इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया ( आयसीएआय ) देखील यात सामील झाले आहे. आयसीएआयने अनेक ऑनलाइन अभ्यासक्रम सुरू केले आहेत. हे अभ्यासक्रम अल्प मुदतीचे आहेत. वेळ आणि बाजाराच्या मागणीनुसार ते डिझाइन केलेले आहेत. विशेष म्हणजे आयसीएआय देत असलेले बहुतेक अभ्यासक्रम विनामूल्य आहेत. काही विशिष्ट कोर्सची यादी आम्ही येथे देत आहोत. आयसीएआयच्या नवीन डिजिटल लर्निंग प्लॅटफॉर्मवर भेट देऊन आपण त्यांच्याबद्दल संपूर्ण माहिती मिळवू शकता. या बातमीमध्ये आपल्याला त्या संकेतस्थळाचा दुवा मिळेल. ICAI चे मोफत अभ्यासक्रम जीएसटी वार्षिक परतावा ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी अँड अकाउन्टन्सी इन्फॉर्मेशन सिस्टीम अँड ऑडिट अर्ली सिग्नल्स ऑफ फ्रॉड बँकिंग सेक्टर फॉरेन्सिक अकाउंटिंग आणि फ्रॉड डिटेक्शन ईबुक - सीजीएसटी / आयजीएसटी / यूटीजीएसटी कायदा आणि नियम (सीजीएसटी / आयजीएसटी / यूटीजीएसटी कायदा आणि नियम) जीएसटी ऑडिटसंबंधी तांत्रिक मार्गदर्शक सायबर सुरक्षा कॉर्पोरेट आणि इतर कायदे ऑडिटिंग आणि अॅश्युरन्स कॉस्ट अँड मॅनेजेमेंट अकाउन्टिंग आंतरराष्ट्रीय कर आकारणी मायक्रोसॉफ्ट एक्सेल मधील डेटा एकत्रीकरण आणि विश्लेषण एम्ब्रेसिंग रोबोटिक्स प्रोसेस ऑटोमेशन आयसीएआय हे जवळपास १२९ कोर्सेस ऑफर करत आहे. हे अभ्यासक्रम वेगवेगळ्या कालावधीचे आहेत. यापैकी कोणताही कोर्स करण्यासाठी तुम्हाला खाली दिलेल्या लिंकवरून वेबसाईटला भेट देऊन नोंदणी करावी लागेल. आयसीएआयच्या डिजिटल लर्निंग प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3bLhtWz
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments