Railway Group D Exam Date: रेल्वे ग्रुप डी परीक्षेच्या तारखेसंदर्भात तब्बल ३२ लाख ट्विट!

Railway Group D Exam Date: (RRC 01/2019 Level 1) परीक्षेच्या तारखेच्या घोषणेसंदर्भात सोशल मिडियाच्या माध्यमातून पुन्हा एकवार उमेदवार आपला आवाज सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहेत. गेल्या वर्षी याच उमेदवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनाला ट्वीटर वर राष्ट्रीय बेरोजगार दिवस म्हणून ट्रेंड केल्यानंतर रेल्वे भरती बोर्डाने आरआरबी एनटीपीसी भरती परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या होत्या. त्यानंतर सात टप्प्यांमध्ये ३१ जुलै २०२१ पर्यंत परीक्षा आयोजित करण्यात आल्या. या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा देशभरातील उमेदवार एक लाखांहून अधिक पदांसाठी रेल्वे रिक्रुटमेंट सेल (आरआरसी) च्या लेवल – 1 म्हणजेच रेल्वे ग्रुप डी भरती परीक्षेच्या आयोजनाच्या तारखांची मागणी करत आहेत. यासाठी विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर #railway_groupd_examdate या हॅशटॅगसह आपला आवाज उठवत आहेत. एकट्या ट्वीटर वर या रेल्वे ग्रुप डी परीक्षेच्या तारखांच्या घोषणांसंबंधी मागणी करण्यासाठी ३२ लाखांहून अधिक ट्विट पोस्ट करण्यात आले आहेत. काय आहे संपूर्ण प्रकरण? रेल्वे भरती आरआरसी मार्फत ग्रुप डी (लेवल १) च्या एक लाखांहून अधिक (1,03,739) पदांवर भरतीसाठी नोटिफिकेशन (सं.RRC 01/2019) २०१९ च्या सुरुवातीला जारी करण्यात आले होते. अर्ज प्रक्रिया १२ मार्च ते १२ एप्रिल २०१९ या कालावधीत राबवण्यात आली. यानंतर निवड प्रक्रियेंतर्गत कॉम्प्युटर आधारित परीक्षा (CBT)चे आयोजन सप्टेंबर/ऑक्टोबर २०१९ मध्ये होणार होते, मात्र करोना महामारी आणि नंतर ३१ जुलै पर्यंत आयोजित करण्यात आलेली दुसरी परीक्षा RRB NTPC यामुळे रेल्वे ग्रुप डी परीक्षेचे आयोजन करता आले नाही. दूसरी मोठी परीक्षा RRB NTPC द्वारे आयोजित नाही केली जाऊ शकत. रेल्वे ग्रुप सी परीक्षा म्हणजेचRRB NTPC च्या आयोजनानंतर उमेदवार ग्रुप डी (लेवल १) ची निवड प्रक्रिया सुरू करण्याची मागणी करत होते आणि सोशल मिडीयावर हॅशटॅग #railway_groupd_examdate सह ट्वीट करत आहेत.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3EPBr1v
via IFTTT

Post a Comment

0 Comments