Also visit www.atgnews.com
CBSE बोर्डाचेही आठवीपर्यंतचे विद्यार्थी प्रमोट
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई देशात करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर देशातील सर्व शैक्षणिक मंडळांच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. मात्र केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या आदेशानुसार केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ ()ने इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय घेतला आहे. मार्च महिन्याच्या मध्यापासून देशातील विविध राज्यांत लॉकडाऊन सुरुवात झाली. हे लॉकडाऊन सुरुवातीला ३१ मार्चपर्यंत होते. यामुळे शिक्षण मंडळांनी सर्व परीक्षा ३१ मार्च पर्यंत पुढे ढकलल्या होत्या. मात्र पंतप्राधन नरेंद्र मोदी यांनी यानंतर २१ दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली. यामुळे देशभरात १४ एप्रिलपर्यंत शाळा सुरू होणे शक्यच नसल्याचे स्पष्ट झाले. याचदरम्यान केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात प्रवेश देण्याचे सुचविले. यानंतर सीबीएसईने एनसीईआरटीशी चर्चा करून हा निर्णय घेतला. याचबरोबर देशातील बहुतांश शाळांमध्ये इयत्ता नववी व अकरावीच्या परीक्षा पार पडल्या आहेत. मात्र केंद्रीय विद्यालय, नवोदय विद्यालये तसेच काही राज्यातील खाजगी सीबीएसई शाळांमध्ये नववी व अकरावीच्या परीक्षा बाकी आहेत. त्यांनी या विद्यार्थ्यांच्या वर्षभरातील शैक्षणिक कामगिरीनुसार त्यांचे मुल्यांकन करून पुढील वर्गात प्रवेश द्यावा. याचबरोबर दहावी व बारावीची ज्या विषयांची परीक्षा बाकी आहे त्याचे वेळापत्रक तयार करणे सद्यस्थितीत अवघड आहे. मात्र या विद्यार्थ्यांचा भवितव्याचा विचार करत त्यांच्या पुढील शिक्षणाच्या प्रवेश परीक्षांचे वेळापत्रक लक्षात घेत त्यापूर्वी ही परीक्षा घेण्यात येईल. यासाठी परीक्षेच्या किमान १० दिवस आधी सर्वांना कळविण्यात येईल, असे मंडळाने पत्रकात स्पष्ट केले आहे. अफवांवर विश्वास ठेवू नये सध्या परीक्षेबाबत अनेक अफवा पसरविल्या जात आहेत. त्यावर विश्वास न ठेवता पालकांनी तसेच शिक्षकांनी अधिकृत माहितीसाठी मंडळाच्या या वेबसाइटवर किंवा पुढील सोशल मीडिया अकाऊंटला भेट द्यावी - Instagram: Twitter: Facebook:
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3dPJ7Dw
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments