Also visit www.atgnews.com
GATE 2020 स्कोअर कार्ड जारी
नवी दिल्ली: २०२० चं स्कोअर कार्ड जारी करण्यात आलं आहे. आयआयटी दिल्लीने ग्रॅज्युएट अॅप्टिट्यूड टेस्ट अर्थात साठी हे स्कोअर कार्ड जारी केलं आहे. हे विद्यार्थ्यांना गेटच्या अधिकृत संकेतस्थळावर gate.iitd.ac.in येथे जाऊन डाऊनलोड करता येईल. हे स्कोअरकार्ड ३१ मे पर्यंत उपलब्ध असेल. जर तुम्ही परीक्षा दिली आहे तर तुम्ही हे स्कोअर कार्ड डाऊनलोड करू शकता. ३१ मे नंतर ही स्कोअरकार्डची लिंक आपोआप डिअॅक्टिवेट होईल. आयआयटी गेट परीक्षेच्या स्कोअर कार्डची मुदत तीन वर्ष असेल. यानंतर पुन्हा परीक्षा द्यावी लागते. काउन्सिलिंग प्रक्रिया परीक्षेत यशस्वी होणाऱ्या उमेदवारांचे काउन्सिलिंग होते. याचं आयोजन लॉकडाऊन संपल्यानंतरच होईल. काऊन्सिलिंगसाठी उमेदवारांना COAPS आणि CCMT द्वारे अर्ज करावा लागेल. आयआयटीमध्ये प्रवेशासाठी उमेदवारांना COAPS द्वारे अर्ज करावा लागतो तर NIT च्या प्रवेशासाठी CCMT द्वारे अर्ज करावा लागतो. असं डाऊनलोड करा स्कोअर कार्ड आयआयटी गेटच्या अधिकृत संकेतस्थळावर - gate.iitd.ac.in - येथे जा आता स्कोअर कार्डच्या लिंकवर क्लिक करा आता येथे विचारलेली माहिती भरा आणि क्लिक करा क्लिक करताच तुम्हाला स्क्रीनवर तुमचा स्कोअर दिसेल आता हे पेज डाऊनलोड करा आणि त्याचं एक प्रिंटआऊट काढा.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/39sw8nK
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments