Also visit www.atgnews.com
करोनावरील उपायासाठी MHRD चं 'समाधान' चॅलेंज
केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या इनोव्हेशन सेलने मंगळवारी ७ एप्रिल रोजी एक ऑनलाइन चॅलेंज लाँच केले आहे. या चॅलेंजचे नाव आहे 'समाधान'. ऑल इंडिया काऊन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशनच्या सहकार्याने हे ऑनलाइन चॅलेंज लाँच करण्यात आले आहे. याचं उद्दिष्ट कोविड - १९ आणि भविष्यातील आव्हानांचा सामना करण्याचं उत्तर शोधणं आणि युवकांना काही नवं करून दाखवण्यासाठी प्रोत्साहित करणं हा आहे. यात सहभागी होण्याची अंतिम मुदत १४ एप्रिल २०२० आहे. फोर्ज अँड इनोवेटक्युरिसच्या संयुक्त विद्यमाने हे चॅलेंज आयोजित करण्यात आलं आहे. काय करायचं आहे? या चॅलेंजमध्ये सहभागी झाल्यानंतर विद्यार्थ्यांना काही कल्पना सुचवायच्या आहेत आणि त्यांचं डिझाइन तयार करायचं आहे. दुसऱ्या टप्प्यात त्याचं प्रोटोटाइप तयार करून ते मंजूर झाल्यानंतर त्याचं वर्किंग मॉडेल तयार करायचं आहे. त्यानंतर ते शासकीय संस्था, आरोग्य आणि अन्य सेवांना व्हायरस महामारी आणि अशाच प्रकारच्या अन्य आपत्तींवरील उपायांसाठी उपलब्ध केले जाईल. या व्यतिरिक्त 'समाधान' चॅलेंजच्या माध्यमातून नागरिकांना जागरुक केले जाईल. याचा वापर नागरिकांना प्रोत्साहित करण्यासाठी, आव्हानांचा सामना करण्यासाठी तयार करण्यासाठीट तसेच स्वत:ला एखाद्या संकटापासून रोखण्यायोग्य बनवण्यासाठी केले जाईल. कसा करायचा अर्ज? या चॅलेंजमध्ये सहभाग नोंदवण्यासाठी तुम्हाला अर्ज करावा लागेल. या दरम्यान तुम्हाला तुमची कल्पना सादर करायची आहे. त्यातून अर्जदारांना शॉर्टलिस्ट केले जाईल. छाननीची ही प्रक्रिया १७ एप्रिल रोजी होईल. २४ एप्रिल रोजी अंतिम यादी जाहीर केली जाईल आणि २५ एप्रिल रोजी एक ग्रँड ऑनलाइन ज्युरी (परीक्षक) विजेते ठरवतील.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/34iuXX2
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments