Also visit www.atgnews.com
'MHT-CET परीक्षा लांबणीवरच; अफवांवर विश्वास नको'
देशातील लॉकडाऊन स्थितीमुळे अखेर राज्याची एमएचटी-सीईटी परीक्षा लांबणीवर पडलेली आहे, विद्यार्थ्यांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन सेलने केले आहे. गुरुवारी ३० एप्रिल रोजी महाराष्ट्र सरकारच्या राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने यासंदर्भातले परिपत्रक जारी केले आहे. राज्यातील इंजिनीअरिंग, फार्मसी आणि कृषी अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी होणारी ही CET १३ ते २३ एप्रिल २०२० या कालावधीत होणार होती. ती पहिल्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर यापूर्वीच अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली होती. त्याबाबतचे परिपत्रक सीईटी सेलने २४ मार्च २०२० रोजी जारी केले होते. तरीही या परीक्षांच्या संभाव्य तारखांबाबतच्या चुकीच्या बातम्या विद्यार्थ्यांमध्ये पसरत आहेत. त्यामुळे सीईटी सेलने गुरुवारी पुन्हा परिपत्रक काढून सीईटी लांबणीवर पडलेली असून नव्या तारखा अधिकृत संकेतस्थळामार्फत जाहीर केल्या जातील, असे स्पष्ट केले आहे. विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहनही सीईटी सेलने केले आहे. या परीक्षेची नवी तारीख सीईटीच्या अधिकृत संकेतस्थळामार्फत जारी केली जाईल, असेही या परिपत्रकात म्हटले आहे. अधिक माहितीसाठी www.mahacet.org या संकेतस्थळावर भेट द्यावी, असे आवाहनही सीईटी सेलने केले आहे. सीईटी परीक्षा लांबणीवर पडल्याची माहिती देणारे २४ मार्च २०२० चे परिपत्रक पाहण्यासाठी सीईटी परीक्षा लांबणीवरच, अफवांवर विश्वास ठेवू नका असे आवाहन करणारे ३० एप्रिल २०२० चे परिपत्रक पाहण्यासाठी
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3aPkB2x
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments