NEET 2020: नीटच्या अभ्यासक्रमात बदल नाही

नवी दिल्ली: NEET च्या अभ्यासक्रमात कोणताही बदल झालेला नाही, असे नॅशनल टेस्टिंग एजन्सी () ने स्पष्ट केले आहे. सोशल मीडियावर नीटचा सिलॅबस बदलल्याच्या फेक न्यूज पसरत आहेत. या पार्श्वभूमीवर एनटीएने हे परिपत्रक जारी करून स्पष्टीकरण दिलं आहे. देशभरातील वैद्यकीय महाविद्यालयांमधील MBBS, BDS या वैद्यकीय आणि दंत वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी नॅशनल एलिजिबिलीटी कम एन्ट्रन्स टेस्ट अर्थात NEET ही प्रवेश परीक्षा घेतली जाते. एनटीएने असंही स्पष्ट केलं आहे की एनटीए हा अभ्यासक्रम ठरवतच नाही, अभ्यासक्रम निश्चित करण्याचं काम मेडिकल काऊन्सिल ऑफ इंडिया करतं आणि हा सिलॅबस एमटीआयच्या mciindia.org या संकेतस्थळावरून घेता येईल. ' ची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना कळवण्यात येते की नीटच्या अभ्यासक्रमात कोणताही बदल झालेला नाही. एनटीए सिलॅबस तयार करत नाही, एटीए केवळ अभ्यासक्रमाची लिंक उपलब्ध करून देते,' असे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे. करोना विषाणूच्या फैलावाच्या पार्श्वभूमीवर देश लॉकडाऊन स्थितीत आहे. अनेक परीक्षा एकतर रद्द झाल्या आहेत, किंवा लांबणीवर पडल्या आहेत. अशा पार्श्वभूमीवर काही ना काही अफवा पसरवण्याचे काम समाजकंटक करत असतात. त्यामुळे विद्याऱ्त्यांनी एनटीएच्या अधिकृत संकेतस्थळावर नियमितपणे नीट परीक्षेबाबतच्या वेळोवेळी दिलेल्या सूचना पाहाव्यात, असे आवाहनही एनटीएने केलं आहे. विद्यार्थ्यांना एनटीएने चौकशीसाठी काही हेल्पलाइन क्रमांकही दिले आहेत. ते पुढीलप्रमाणे आहेत - 8287471852, 8178359845, 9650173668, 9599676953, 8882356803


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3dSUZo7
via IFTTT

Post a Comment

0 Comments