SBI Clerk 2020: मेन्स परीक्षा स्थगित

करोना व्हायरस आणि लॉकडाऊनमुळे भारतीय स्टेट बँकेतील क्लर्क पदाच्या भरतीसाठी होणारी मेन परीक्षा स्थगित करण्यात आली आहे. भरती प्रक्रियेवर लॉकडाऊनचा परिणाम झाला आहे. या भरतीसाठी पूर्व परीक्षा यापूर्वीच फेब्रुवारी महिन्यात घेण्यात आली आहे. १९ एप्रिल रोजी मुख्य परीक्षा होणार होती, जी स्थगित झाली आहे. ही भरती ८ हजार पदांसाठी होणार होती. यासंबंधी ने एक परिपत्रक जारी केलं आहे. यात मुख्य परीक्षा स्थगित झाल्याची माहिती देण्यात आली आहे. शिवाय पूर्व परीक्षेच्या निकालाबाबतही माहिती देण्यात आली आहे. एसबीआय क्लर्क भर्ती प्रक्रियेतील पूर्व परीक्षेचं आयोजन २२,२९ फेब्रुवारी आणि १, ८ मार्च २०२० रोजी करण्यात आलं होतं. याचा निकाल अद्याप जाहीर झालेला नाही. उमेदवार या निकालाची वाट पाहत आहेत. एसबीआयच्या परिपत्रकात लिहिलं होतं की 'नोवेल करोना व्हायरसमुळे बिघडलेली परिस्थिती लक्षात घेऊन SBI clerk / Junior Associates ची ऑनलाइन मुख्य परीक्षा स्थगित करण्यात येत आहे. ही परीक्षा १९ एप्रिल २०२० रोजी होणार होती. या परीक्षेची नवी तारीख आणि पूर्व परीक्षेचा निकाल कधी घोषित होईल याची तारीख वेबसाइटवर घोषित केली जाईल.' असं म्हटलं जातंय की परीक्षेची नवी तारीख लॉकडाऊनंतरच जाहीर होईल. अॅडमिट कार्डही १५ एप्रिलनंतरच मिळते. यासंबंधातील सर्व माहिती उमेदवारांना एसबीआयच्या संकेतस्थळावर मिळेल.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/345XaA1
via IFTTT

Post a Comment

0 Comments