दहावीच्या मुलांसाठी अभ्यासाच्या टिप्स

> प्रतिभा पगारे जगातील असा एकही घटक नाही, ज्याच्यावर करोनाचा परिणाम झालेला नाही. आपल्या देशातही वेगळी परिस्थिती नाही. राजकारणी, नोकरदार, कामगार, मजूर, शेतकरी हे सर्वच घटक यातून सुटलेले नाहीत. यात अजून एक घटक आहे तो म्हणजे विद्यार्थी - काही वर्गांच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या तर काही वर्गांच्या परीक्षांबाबत अजूनही सरकार काही स्पष्ट करू शकलेले नाही. ज्या विद्यार्थ्यांना परीक्षा न देता पुढच्या वर्गात जायला मिळणार आहे त्यांच्या आनंदाची आपण मोजदाद करू शकत नाही. यात आपला फायदा आहे की नुकसान हा विचार करण्याचे त्यांचे वयही नाही. काही पालकही या निर्णय़ाने सुखावले आहेत. परंतु यंदा नववीतून दहावीत जाणारे विद्यार्थी आणि त्यांचे पालक काही अंशी चिंतेत आहेत. साधारण मार्चमध्येच नववीच्या परीक्षा येऊन दहावीच्या अभ्यासाला सुरूवात होते. परंतु यंदा हे शक्य झालेलं नाही. टाळेबंदी किती दिवस पुढे जाईल याची शाश्वती नाही. त्यामुळे विद्यार्थी-पालक नक्कीच अभ्यास कसा नि काय करावा या विचारात असतील. अशा विद्यार्थ्यांसाठी काही टिप्स... १) पाठ्यपुस्तके एकदा वाचून काढा. २) भाषा विषयांसाठी मागील वर्षीचे संपूर्ण व्याकरण व लेखन कौशल्य याचा पुन्ह अभ्यास करा / सराव करा. ३) विशेषत: लेखन कौशल्य हे नववीत जे तुम्ही नववीत अभ्यासला आहात, तेच दहावीत असते. ४) समाजशास्त्र (इतिहास व भूगोल) यातला ५० टक्के भाग विद्यार्थी स्वत: वाचून अभ्यासू शकतात. ५) गणित भाग १ आणि भाग २ देखील विद्यार्थी इयत्ता नववीच्या ज्ञानाच्या आधारे अभ्यासू शकतात. ६) विज्ञानाची भीती सर्वच मुलांना वाटते परंतु विज्ञानाच्या पुस्तकांची रचना तुम्ही पाहिलीत तर कितीतरी महत्त्वाचे मुद्दे ठळकपणे दिलेले आहेत, त्यांच्या वाचनाने देखील विद्यार्थी विज्ञान समजून घेऊ शकतात. ७) विविध विषयांवरील आकृत्यांचा सराव करू शकता. ८) या लिंकवर सर्व पुस्तके मोफत उपलब्ध आहेत. हेही वाचा:


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3d93b2g
via IFTTT

Post a Comment

0 Comments