शिष्यवृत्ती 'महाडीबीटी'वर; रक्कम विद्यार्थ्यांच्या थेट बँक खात्यात जमा होणार

म. टा. प्रतिनिधी, पुणे राज्यातील कृषी विद्यापीठांतील दहा अभ्यासक्रमांना व्यावसायिक अभ्यासक्रमांना दर्जा काही दिवसांपूर्वी मिळाला आहे. या दहा अभ्यासक्रमांसाठी विमुक्त जाती, भटक्या जाती, इतर मागास वर्ग आणि विशेष मागास प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षण शुल्क, , परीक्षा शुल्क, निर्वाह भत्ता प्रतिपूर्तीच्या योजना पोर्टलवर प्रणालीवर कार्यान्वित करण्याचा निर्णय राज्य सरकारच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाने घेतला आहे. या निर्णयामुळे अभ्यासक्रमाची शुल्क संबंधित रक्कम आता संबंधित प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या थेट बँक खात्यात जमा केली जाणार आहे. राज्यातील कृषी विद्यापीठांतील अभ्यासक्रमांना व्यावसायिक अभ्यासक्रम म्हणून घोषित केले आहेत. या अनुषंगाने इतर मागास बहुजन कल्याण संचालनालयाने संबंधित अभ्यासक्रमांसाठी शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क लागू करण्याबाबतचा प्रस्ताव सादर केला होता. या पार्श्वभूमीवर शैक्षणिक वर्ष २०२१-२२ या शैक्षणिक वर्षापासून शुल्कसंबंधित योजना महाडीबीटी आणि सेवा प्रणालीवर कार्यान्वित करण्यास मान्यता देण्यात आल्याचा सरकारी निर्णय इतर मागास बहुजन कल्याण विभागाने प्रसिद्ध केला आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून शिष्यवृत्तीसाठी अर्ज दाखल करावे लागणार आहे. त्यानंतर कागदपत्रांच्या पडताळणीनंतर शिष्यवृत्तीची रक्कम विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होईल. दरम्यान, हा निर्णय केवळ सरकारी कृषी विद्यापीठातील दहा अभ्यासक्रमांना लागू आहे. त्याचप्रमाणे या अभ्यासक्रमांना पूर्वलक्ष्यी प्रभावाने लाभ मिळणार नसल्याचे सरकारी निर्णयात नमूद करण्यात आले आहे. याबाबतची अधिक माहिती निर्णयात दिली आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3igJOcU
via IFTTT

Post a Comment

0 Comments