Also visit www.atgnews.com
यूपीएससी पूर्व परीक्षा अखेर लांबणीवर
कोव्हिड-१९ विषाणूच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर देशात तिसऱ्या टप्प्यात लॉकडाऊन वाढवल्यानंतर अखेर केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात यूपीएससीने ३० मे रोजी होणारी पूर्व परीक्षा लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतला. परीक्षेची पुढील तारीख घोषित करण्यासाठी २० मे रोजी पुन्हा एकवार परिस्थितीचा आढावा घेण्यात येईल असं आयोगाने जाहीर केलं आहे. यापूर्वी अनेक राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा परीक्षा लॉकडाऊनमुळे स्थगित करण्यात आल्या होत्या. महाराष्ट्र राज्य सेवा आयोगाचीही परीक्षा लांबणीवर टाकण्यात आली होती. मात्र यूपीएससी पूर्व परीक्षा २०२० बाबत कोणताही निर्णय घेण्यात आला नव्हता. ही परीक्षा पूर्व नियोजित वेळेनुसार ३० मे रोजी होणार होती. मे अखेर परीक्षा असल्याने देशभरातील लॉकडाऊननंतरच्या स्थितीचा आढावा घेण्यात येणार होता. मात्र ३ मे रोजी संपणारा देशातला लॉकडाऊन कालावधी १७ मे पर्यंत वाढवण्यात आला आणि त्यानंतर आयोगाने ४ मे रोजी हा निर्णय जाहीर केला. यूपीएससीने जारी केलेल्या परिपत्रकात असे म्हटले आहे की केंद्रीय लोक सेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षा २०२० चं आयोजन आता ३१ मे रोजी होणार नाही. २० मे रोजी देशातील परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर यथावकाश पुढील तारीख जाहीर केली जाईल. उमेदवारांनी यूपीएससी परीक्षेची तयारी सुरूच ठेवावी. लॉकडाऊनच्या कालावधीचा सदुपयोग करावा, असे आवाहन आयोगाने केले आहे. यूपीएससी सिव्हील सर्व्हिस परीक्षेसाठी गेली ६ वर्षे विचारलेल्या प्रश्नांचा आढावा घ्यावा, उजळणी करावी, असंही आयोगाने सांगितलं आहे. यूपीएससी पूर्व परीक्षेच्या मागील सहा वर्षांच्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी यूपीएससीचं परीक्षेसंदर्भातील परिपत्रक पाहण्यासाठी
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3fdRQjz
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments