स्टाफ सिलेक्शन कधी करणार निकालांच्या तारखांची घोषणा?...वाचा

Exams 2020: कर्मचारी निवड आयोगाने (SSC) अद्याप कनिष्ठ अभियंता २०१८ पेपर २, एमटीएस २०१९ पेपर २, सीजीएल २०१८ टियर ३ ( CGL 2018) यासह इतर परीक्षांचे निकाल जाहीर केलेले नाहीत. परीक्षेच्या निकालास उशीर होण्याचे कारण म्हणजे करोना विषाणूचा साथीचा रोग आणि त्यामुळे देशात जारी करण्यात आलेला लॉकडाउन. कर्मचारी निवड आयोगाचे सदस्य राजीव श्रीवास्तव यांच्याशी या परीक्षांच्या निकालांची तारखांविषयी नवभारत टाइम्स ऑनलाइनने बातचीत केली. एसएससी सदस्य राजीव श्रीवास्तव यांनी सांगितले की, 'स्टाफ सिलेक्शन परीक्षांना होणाऱ्या विलंबाच मुख्य कारण म्हणजे करोना महामारीमुळे उद्भवलेली स्थिती. अनेक परीक्षांचे मूल्यांकन अद्याप बाकी आहे. एसएससी ते पूर्ण करण्याच्या मागे लागले आहे. १ जून रोजी परीक्षेच्या निकालाच्या तारखेसंदर्भात बैठक होणार असून जूनच्या पहिल्या आठवड्यात निकाल जाहीर केला जाईल.' ते म्हणाले, 'परीक्षांचे निकाल लावण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी लागू शकतो, कारण बरेच परीक्षक कार्यालयात पोहोचू शकत नाहीएत. मूल्यांकनाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी यामुळे अडचण येत आहे.' एसएससीच्या अनेक परीक्षांचे निकाल प्रलंबित आहेत. लाखो उमेदवार अनेक महिन्यांपासून या परीक्षांच्या निकालाची प्रतीक्षा करत आहेत. एसएससीच्या MTS 2019 पेपर 2 आणि CGL 2018 टायर 3 चे उमेदवार आधीच निकालावर नाराज आहेत. कारण या उमेदवारांना UFM इमॅजिनरीमुळे अपात्र ठरण्याची भीती आहे. सीएचएसएल 2018 च्या टायर 2 परीक्षेप्रमाणे या परीक्षांमध्येही उमेदवारांना पत्रलेखन होते. अनेक उमेदवारांनी पत्रात काल्पनिक पत्ता लिहिला आहे, आता त्यांना भीती वाटत आहेत की चांगला स्कोर मिळूनही या तांत्रिक चुकीमुळे ते नापास होऊ शकतात.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3c91dOw
via IFTTT

Post a Comment

0 Comments