NEET PG: पुढील वर्षीपासून कॉमन काऊन्सेलिंग घ्या - SC

Supreme Court on process: मेडिकल पीजी अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी नॅशनल एलिजिबीलीटी कम एन्ट्रन्स टेस्ट अर्थात NEET चे आयोजन केले जाते. आता या प्रवेश प्रक्रियेतील काउन्सेलिंग प्रक्रियेत बदल होऊ घातला आहे. सर्वोच्च न्यायालयाने यासंदर्भात नॅशनल एक्झामिनेशन बोर्ड (NBE) ला निर्देश दिले आहेत. नॅशनल एक्झामिनेशन बोर्ड नीट पीजीचं आयोजन करतं. पीजी अभ्यासक्रमांसाठी विविध कोर्सेसनुसार विविध काउन्सेलिंग प्रक्रिया होते. यामुळे विद्यार्थ्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. म्हणून वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या चार विद्यार्थ्यांनी याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर न्या. यूयू ललित आणि न्या. दिनेश माहेश्वरी यांच्या खंडपीठाने सुनावणी दिली. खंडपीठाने सांगितलं की यावर्षी तर काउन्सेलिंगची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. अशा वेळी कोणताही आदेश देणं योग्य होणार नाही. मात्र पुढील वर्षी (२०२१) पासून नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशनने कॉमन / सिंगल ऑनलाइन काउन्सेलिंग करण्यावर भर द्यावा. कोर्टाने बोर्डाला सांगितलं की सर्व पीजी मेडिकल कोर्सेससाठी (डिग्री, डिप्लोमा, डीएनबी) एकच काउन्सेलिंग करण्यावर विचार करा. नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन (NBE) एक स्वायत्त संस्था आहे. ही संस्था आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत काम करते.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3gqUJOq
via IFTTT

Post a Comment

0 Comments