आयआयएम उदयपूरचे १८ ऑनलाइन अभ्यासक्रम

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, उदयपूर यांनी २०१९-२१ बॅचसाठी व्हर्च्युअल प्लॅटफॉर्मवर १८ ऑनलाइन व्यवस्थापन अभ्यासक्रम सुरू केले आहेत. लॉकडाऊन सुरू असतानाही अभ्यासक्रम सुरू ठेवणे हा ऑनलाइन कोर्स सुरू करण्यामागील हेतू आहे. ऑपरेशन्स, एचआर, मार्केटिंग, फायनान्स, अॅनालिटिक्स अंतर्गत इलेक्टिव्ह आणि ऐच्छिक कोर्स उपलब्ध करून दिले जात आहेत. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, उदयपूरचे संचालक जनत शहा म्हणाले, 'आम्ही ऑनलाइन शिक्षणाच्या प्रसारासाठी पायाभूत सुविधा तयार करत आहोत. आमचे विद्याशाखा सदस्य ऑनलाईन पद्धतीने फिनटेक, ब्लॉकचेन आणि स्ट्रॅटेजिक डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन या विषयांवर लहान अभ्यासक्रम उपलब्ध करून देत आहेत.' इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट आपल्या या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना त्यांचा मोकळा वेळ सत्कारणी लावण्यास मदत करेल, असेही ते म्हणाले. आता विविध विद्यापीठांतील २५ टक्के शिक्षण ऑनलाईन पद्धतीने पूर्ण केले जात आहे. ऑनलाईन शिक्षणावर आधारित या केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या धोरणांतर्गत देशातील विविध महाविद्यालयांमध्ये आता ७५ टक्के अभ्यास वर्गात होईल तर ऑनलाइन माध्यमांच्या आधारे २५ टक्के अभ्यास पूर्ण होतील.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2xMkPdm
via IFTTT

Post a Comment

0 Comments