Also visit www.atgnews.com
बीएसएफ हेड कॉस्टेबल परीक्षेचा निकाल जाहीर
सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) हेड कॉन्स्टेबल (आरओ / आरएम) च्या फेज ३ डिस्क्रिप्टिव्ह परीक्षेचा ( BSF ) जाहीर केला आहे. फेज ३ परीक्षेत भाग घेतलेले उमेदवार अधिकृत वेबसाइट bsf.nic.in वर जाऊन त्यांचे निकाल तपासू शकतात. सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) फेज ३ डिस्क्रिप्टिव्ह परीक्षेचं आयोजन २ फेब्रुवारी २०२० रोजी देशभरातील विविध केंद्रांवर केलं होतं. लेखी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना अंतिम वैद्यकीय परीक्षेत सहभागी व्हावं लागेल. बीएसएफच्या वैद्यकीय मंडळाचे अधिकारी योग्य वेळेत वैद्यकीय तपासणीची तारीख, वेळ आणि ठिकाण जाहीर करतील. निकालासंदर्भात दिलेल्या अधिकृत नोटीसनुसार, “उमेदवाराने सादर केलेल्या माहितीच्या आधारे निकाल तात्पुरता जाहीर केला जात आहे. कोणत्याही स्तरावर काही विसंगती असल्यास त्या उमेदवाराला बाहेर केले जाईल. अधिकृत संकेतस्थळाखेरीज उमेदवार खाली दिलेल्या थेट लिंकवर क्लिक करून आपला निकाल देखील पाहू शकतात. निकाल पीडीएफ स्वरूपात जाहीर करण्यात आला आहे, निवडलेल्या उमेदवारांची नावे व अनुक्रमांक पीडीएफच्या या यादीमध्ये देण्यात आले आहेत. निकाल पाहण्यासाठी
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2xIiZtZ
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments