Also visit www.atgnews.com
युवकांना दिली जाणार मेंटल फिटनेस ट्रेनिंग
फिट इंडिया मोहिमेंतर्गत आता उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावरही भर दिला जाणार आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या पुढाकाराने विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी त्यांना मेंटल फिटनेस ट्रेनिंग दिली जाणार आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक म्हणाले, 'यूजीसीने उच्च शिक्षण संस्थांसाठी विशेष मार्गदर्शक तत्त्वे जारी केली असून त्या अंतर्गत विद्यार्थ्यांसाठी फिटनेस मोहीम राबविण्यात येणार आहे.' विद्यार्थ्यांसाठी विविध प्रकारचे फिटनेस प्रोग्राम देशभरातील शाळांमध्ये यापूर्वीच सुरू करण्यात आले आहेत. मात्र उच्च शिक्षण क्षेत्रात सुरू करण्यात येणारा फिटनेस प्रोग्राम वेगळ्या स्तराचा असू शकतो. हे मानसिक ताणतणाव कमी करण्याचे उपाय सांगितले जातील. मनुष्यबळ विकास मंत्रालयाने ऑनलाइन अभ्यासक्रमांना शारीरिक आणि मानसिक फिटनेसशी जोडण्याचे महत्त्वाचे काम केले आहे. मंत्रालयाच्या या पुढाकारानंतर आता योग आणि शारीरिक तंदुरुस्तीचे प्रशिक्षित शिक्षक विद्यार्थ्यांना घरात राहूनच व्यायाम करायला शिकवत आहेत. याशिवाय शाळा बंद असताना ऑनलाइन अभ्यासक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मानसिक संतुलन राखण्यासाठी विविध पध्दतीही शिकविल्या जात आहेत. विद्यार्थ्यांचे आरोग्य लक्षात घेऊन तयार केलेले हे विशेष वर्ग केंद्रीय क्रीडा मंत्रालयाच्या फिट इंडिया कार्यक्रमाच्या मदतीने घेण्यात येत आहेत. या वर्गांमध्ये विद्यार्थ्यांसाठी मूलभूत व्यायाम, आहारातील पोषण, योग, ध्यान आणि प्रतिकारशक्ती वाढवण्यासंबंधीच्या सूचना ऑनलाईन दिल्या जातील.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3d65Glw
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments