सीबीएसी दहावी, बारावी निकाल कधी? मंत्र्यांनी दिली माहिती

CBSE 10th 12th Exam 2020 update: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) च्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा १ जुलै पासून होणार आहेत. १५ जुलैपर्यंत सर्व विद्यार्थ्यांच्या परीक्षा पूर्ण करण्यात येणार आहेत. पण या दरम्यान दहावी, बारावीच्या निकालाबद्दलही विद्यार्थी-पालक प्रश्न विचारत आहेत. मागील वर्षी सीबीएसई दहावी, अखेरपर्यंत घोषित झाले होते. पण यंदा परिस्थिती कोविड - १९ संक्रमणामुळे सामान्य नाही. अशात लाखो विद्यार्थी, पालकांना निकालाची प्रतीक्षा आहे. कारण विशेषत: बारावीच्या विद्यार्थ्यांचे करिअरचे भवितव्य या निकालावर अवलंबून आहे. आता केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक (HRD Minister Nishank) यांनी स्वत: याबाबतची माहिती दिली आहे. निशंक म्हणाले, 'सीबीएसई बोर्डाच्या निकालांची घोषणा १५ ऑगस्टपर्यंत केली जाऊ शकते. बोर्ड काही दिवसांच्या अंतराने दहावी आणि बारावीचे निकाल जाहीर करेल.' पोखरियाल म्हणाले की १५ ऑगस्ट २०२० पर्यंत दहावी, बारावीच्या परीक्षांचे निकाल जाहीर केले जातील. हे निकाल फेब्रुवारी-मार्च २०२० आणि जुलै २०२० या दोन्ही टप्प्यांत झालेल्या परीक्षा मिळून तयार केला जाईल. तूर्त सीबीएसई शाळा आणि संबंधित विभाग १ जुलैपासून सुरू होणाऱ्या परीक्षांच्या तयारीला लागले आहेत.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2zbY0jO
via IFTTT

Post a Comment

0 Comments