Also visit www.atgnews.com
यूजीसीच्या विद्यापीठ, कॉलेजांसाठी गाईडलाइन्स जारी
UGC : विद्यापीठ अनुदान आयोगाने पदवीपूर्व आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्याच पहिल्या वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी नवे शैक्षणिक कॅलेंडर २०२०-२१ जारी केले आहे. तज्ज्ञांच्या समितीच्या शिफारशींनंतर यूजीसीने गाईडलाइन्स जारी केल्या आहेत. या गाईडलाइन्सनुसार, यूजी आणि पीजी अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षाची सुरुवात १ नोव्हेंबर २०२० पासून होणार आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांनी आपल्या ट्विटर हँडलद्वारे या गाईडलाइन्स जाहीर केल्या. यूजीसीने सर्व विद्यापीठे आणि महाविद्यालयांना निर्देश दिले आहेत की अंडरग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षांची प्रवेश प्रक्रिया ३१ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण व्हायला हवेत. या कॅलेंडरनुसार पहिल्या वर्षीची परीक्षा ८ मार्च २०२१ ते २६ मार्च २०२१ पर्यंत आयोजित केली जाणार आहे. विद्यापीठांना यूजीसीने विद्यार्थ्यांच्या नव्या बॅचच्या सुट्ट्या कमी करण्याचेही निर्देश दिले आहेत. विद्यापीठांनी सहा दिवसांचा शैक्षणिक आठवडा करावा, असेही सुचवण्यात आले आहे. जर परीक्षांचे निकाल उशीरा लागले तर विद्यापीठांनी १८ नोव्हेंबर २०२० पर्यंत शैक्षणिक सत्र सुरू करावे, असेही यूजीसीने सांगितले आहे. विद्यार्थ्यांनी ३० नोव्हेंबरपर्यंत प्रवेश रद्द केले तर त्यांचा शुल्क परतावा करावा असेही यूजीसीचे निर्देश आहेत. त्यानंतर विद्यापीठ किंवा कॉलेजने जास्तीत जास्त १ हजार रुपये प्रोसेसिंग फी कापून उर्वरित शुल्क परतावा करावा असे म्हटले आहे. याशिवाय प्रत्येक विद्यापीठ तसेच कॉलेजला कोविड - १० महामारीच्या पार्श्वभूमीवर, शैक्षणिक कार्यासाठी सर्व आवश्यक ती खबरदारी घेण्याच्या सूचना विद्यापीठ अनुदान आयोगाने केल्या आहेत.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3mT8Qz5
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments