Also visit www.atgnews.com
दहावी उत्तीर्णांसाठी पोस्टात परीक्षेशिवाय भरती
India Post Vibhag Bharti 2020: दहावी उत्तीर्णांसाठी टपाल खात्यात मोठी संधी आहे. भारतीय टपाल खात्याने पुन्हा हजारो पदांवर भरती काढली आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सोमवार, ८ जून २०२० पासून सुरू झाली आहे. कोणत्या राज्यात, कोणत्या पोस्टल सर्कलमध्ये या भरती होतील? एकूण पदांची संख्या कोठे आहे? अर्ज कसा करावा पात्रता काय आहेत? ही सर्व माहिती पुढे देण्यात आली आहे. तसेच अधिसूचना आणि अधिकृत संकेतस्थळांच्या लिंक्सही दिल्या आहेत. पदांची माहिती एकूण पदांची संख्या - ४,१६६ हरयाणा पोस्टल सर्कल - ६०८ पदे मध्य प्रदेश पोस्टल सर्कल - २,८३४ पदे उत्तराखंड पोस्टल सर्कल - ७२४ पदे आवश्यक पात्रता या भरती प्रक्रियेत सामील होण्यासाठी उमेदवारांनी मान्यताप्राप्त मंडळाकडून दहावी उत्तीर्ण केलेली असावी. या व्यतिरिक्त उमेदवारांचे किमान वय १८ आणि जास्तीत जास्त ४० वर्षे निश्चित केले गेले आहे. आरक्षणानुसार कमाल वयोमर्यादेमध्ये सवलतीचा लाभही देण्यात येईल. वयाची गणना ८ जून २०२० पर्यंत केली जाईल. अर्जाची माहिती ऑनलाईन अर्ज करायचे आहेत. ८ जून २०२० पासून ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ७ जुलै २०२० आहे. ऑनलाईन अर्जाची लिंक पुढील दिली आहे. त्यावर क्लिक करा आणि दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे अनुसरण करा आणि विनंती केलेली माहिती भरा. निवड प्रक्रिया उमेदवारांना या पदांवर परीक्षेशिवाय नोकरी मिळणार आहे. मुलाखतही द्यावी लागणार नाही. दहावीमध्ये मिळवलेल्या गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार केली जाणार आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2BLyFOA
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments