Also visit www.atgnews.com
दिल्ली विद्यापीठ प्रवेशांसाठी हेल्पलाइन, ईमेल्स जारी
दिल्ली विद्यापीठाने विद्यार्थ्यांच्या प्रवेशाशी संबंधित माहितीसाठी अनेक ईमेल आणि फोन नंबर जारी केले आहेत. दिल्ली विद्यापीठात यूजी आणि पीजी प्रवेशाच्या तारखाही लवकरच जाहीर केल्या जातील. हेल्पलाईन नंबरची माहिती खाली दिली आहे. मेल आयडी: undergraduate2020@admission.du.ac.in (पदवीपूर्व प्रवेशांशी संबंधित माहितीसाठी) मेल आयडी: pg2020@admission.du.ac.in (पोस्ट ग्रॅज्युएट / MPhil / पीएचडी प्रवेशासंबंधित माहितीसाठी) हेल्पलाइन क्रमांक 9650232137 9582756236 7290806670 UG एन्ट्रन्स बेस्ड प्रवेशांसाठी हेल्पलाईन क्रमांक 9149002539 9953634922 पोस्ट ग्रॅज्युएट / एमफिल / पीएचडी प्रवेशांसाठी हेल्पलाईन क्रमांक- 9654450932 कटऑफ यादी नाही उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, सीबीएसई निकाल येण्याआधी विद्यापीठ कटऑफ यादी जारी करू शकत नाही. सीबीएसई बारावीचा निकाल जुलैअखेर किंवा ऑगस्टच्या सुरूवातीला येऊ शकतो. दिल्ली विद्यापीठाचे सुधारित शैक्षणिक कॅलेंडर देखील जारी करण्यात आले आहे. दिल्ली विद्यापीठामध्ये शैक्षणिक वर्ष २०१९-२० ची उन्हाळी सुट्टी १३ जून ते २० जून २०२० पर्यंत असेल. डीयूचे सुधारित कॅलेंडर अधिकृत वेबसाइट www.du.ac.in वर पाहता येईल. शिक्षकांच्या नेमणुकीसाठी स्क्रीनिंग यादी जारी दिल्ली विद्यापीठाने आपल्या विभागाची रिक्त पदे भरण्यासाठी स्क्रिनिंग यादी जारी केली . विद्यापीठाने आपल्या पोर्टलसाठी ही यादी १६ विभाग आणि २ केंद्रांच्या सहाय्यक प्राध्यापकांच्या नियुक्तीसाठी देखील यादी अपलोड केली आहे. कोविड - १९ जुलै किंवा ऑगस्टपासून या कायम पदांसाठी नियुक्ती प्रक्रिया सुरू होऊ शकेल. तसेच उर्वरित विषयांची स्क्रीनिंग यादी लवकरच वेबसाइटवर प्रसिद्ध केली जाईल. एकूण २६२ पदांची नेमणूक व्हायची आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2UtshCa
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments