Also visit www.atgnews.com
नीट पीजी २०२०: दुसऱ्या राऊंडच्या काऊन्सेलिंगला सुरुवात
NEET PG 2020: नीट पीजीच्या काऊन्सेलिंगच्या दुसऱ्या राउंडसाठी नोंदणी करण्याची प्रक्रिया आजपासून सुरू झाली आहे. ज्या विद्यार्थ्यांनी NEET PG राऊंड १ काऊन्सेलिंग क्वालिफाय केले आहे, ते काऊन्सेलिंगच्या दुसऱ्या राउंडसाठी पात्र ठरले आहे. चे शेड्युल मेडिकल काऊन्सेलिंग कमिटी (MCC) च्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे. नोंदणी प्रक्रिया ३ जून ते ९ जून २०२० या कालावधीत सुरू राहणार आहे. ९ जून २०२० रोजी सकाळी १० वाजेपर्यंत नोंदणीची मुदत आहे. शुल्क भरण्याची प्रक्रिया ९ जून २०२० रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत सुरू असणार आहे. पसंतीक्रम भरून अर्ज लॉक करण्याचा पर्याय ४ जून ते ९ जून २०२० पर्यंत उपलब्ध असणार आहे. मेडिकल काउन्सिल ऑफ इंडियाने दुसऱ्या राउंडला पात्र असलेल्या ३३० विद्यार्थ्यांची यादी जाहीर केली होती. पहिल्या राऊंडसाठी ८,९८३ विद्यार्थ्यांची निवड झाली होती. नीट पीजीचा काउन्सेलिंगचा पहिला राउंड मार्च महिन्यात झाला आहे. दुसऱ्या राऊंडची सीट अलॉटमेंट प्रक्रिया १० जून २०२० ते ११ जून २०२० या कालावधीत सुरू राहील. नीट पीजी २०२० च्या दुसऱ्या राऊंडचा निकाल १२ जून २०२० रोजी जारी होईल. ज्या विद्यार्थ्यांचे यादीत नाव येईल त्यांनी त्या त्या महाविद्यालयामध्ये १२ जून ते १८ जून २०२० या कालावधीत आपले प्रवेश निश्चित करायचे आहेत. ज्या जागा या प्रक्रियेनंतर रिक्त राहतील त्यांच्यावर ५० टक्के ऑल इंडिया पीजी कोटा जागा तसेच स्टेट कोटा जागा देण्याची प्रक्रिया १८ जून २०२० रोजी सायंकाळी सहा वाजता होईल.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2Y0rjhT
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments