कॉलेजांनी शुल्कवाढ करू नये; मुंबई विद्यापीठाच्या सूचना

मुंबई विद्यापीठाच्या संलग्न महाविद्यालयांनी पुढील शैक्षणिक वर्षासाठी फीवाढ करू नये, अशी सूचना मुंबई विद्यापीठाने केली आहे. तसे परिपत्रक विद्यापीठाने जारी केले आहे. शैक्षणिक वर्ष २०२०-२०२१ या वर्षाकरिता कोणत्याही शैक्षणिक शुल्कात वाढ करू नये तसेच गरजू विद्यार्थ्याने विनंती केल्यास त्याच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करून विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क (Tution Fees) अदा करण्यासाठी हप्त्यांची (Instalments) सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी. कोविड - १९ या जागतिक महामारीमुळे देशात २३ मार्च २०२० पासून केंद्र शासनाने संपूर्ण देशात टाळेबंदी जाहीर केली आहे. त्यामुळे राज्यातील उद्योगधंदे / व्यवसाय / खासगी नोकरी आदी क्षेत्रात काम करणाऱ्या नागरिकांच्या आर्थिक परिस्थितीवर परिणाम झालेला आहे. या परिस्थितीचा विचार करून करू नये, अशा सूचना विद्यापीठाने केल्या आहेत. करोनासंबंधी लॉकडाउनमुळे अर्थव्यवस्था धोक्यात आली आहे. अनेकांचे रोजगार बुडाले असून काहींच्या नोकऱ्याही गेल्या आहेत. या पार्श्वभूमीवर शाळा व कॉलेजांनी शुल्कवाढ करू नये. तसेच पालकांकडे शुल्क भरण्यासाठी तगादा लावू नये असे स्पष्ट निर्देश सरकारने दिले आहेत. असे असले तरीही शिक्षण संस्थांच्या माध्यमातून शुल्क वसुलीसाठी तगादा लावला जात होता. याविरोधात विविध विद्यार्थी संघटनांनी आवाज उठविला होता. खासगी व स्वायत्त कॉलेजांबरोबरच मुंबई विद्यापीठाशी संलग्न कॉलेजमधील प्रशासनाकडून पुढील वर्षाचे शैक्षणिक शुल्क तातडीने भरण्याची सक्ती विद्यार्थी व पालकांवर करण्यात येत आहे. त्यामुळे ही सक्ती थांबवण्यात यावी, तसेच कॉलेजांनी शैक्षणिक शुल्कामध्ये वाढ करू नये, असे आदेश विद्यापीठाने द्यावेत, अशी मागणी विद्यार्थी संघटनांनी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री, कुलगुरू, तंत्र शिक्षण संचालक यांच्याकडे केली होती.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2V70SGF
via IFTTT

Post a Comment

0 Comments