Also visit www.atgnews.com
सरकारने विद्यार्थ्यांची दिशाभूल केली आहे: अभाविप
व्यावसायिक, अव्यावसायिक, ATKT वर्गवारी करून, सरकारने विद्यार्थ्यांची दिशाभूल केली आहे. सरकारच्या निर्णय विरोधाभास निर्माण करणारा आहे, उलट व्यावसायिक शिक्षणाचे नाव घेत राज्य सरकारने स्वतःची जवाबदारी केंद्रीय संस्थांकडे ढकलली आहे, असा आरोप अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने केला आहे. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी शुक्रवारी १९ जून रोजी अंतिम वर्षांच्या परीक्षा बाबतचा अंतिम निर्णय झाला असल्याचे जाहीर केले, परंतु यात सरकारने केलेल्या व्यावसायिक, अव्यावसायिक, ATKT वर्गवारीने उदय सामंत यांनी विद्यार्थ्यांची दिशाभूलच केली आहे. अव्यावसायिक म्हणजेच पारंपरिक अभ्यासक्रमात आतापर्यंत पास झालेल्या विद्यार्थ्यांनाच फायदा होणार असून ते विद्यार्थी किती? असा प्रश्न अभाविपने सरकारला विचारला आहे. राज्याचे मुख्यमंत्री व मंत्री यांनी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेत असताना सखोल अभ्यास न केल्यानेच आज व्यावसायिक, अव्यावसायिक, ATKT वर्गवारी सरकारला करावी लागली आहे. त्यातच महाराष्ट्रात व्यावसायिक म्हणजेच इंजीनियरिंग, फार्मासी, हॉटेल मॅनेजमेंट, कला शास्त्र विषयांत शिक्षण घेणारे लाखो विद्यार्थी आहेत. त्यामुळे या अभ्यासक्रमांबाबत लक्ष घालणाऱ्या उच्चस्तरीय संस्था या अखिल भारतीय असल्याने त्या अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांचा निर्णय त्या संस्थाकडे ढकलत आपली जवाबदारी ढकलण्याचे काम आज सरकारने केले आहे, हे अत्यंत दुर्दैवी आहे असे अभाविपचे स्पष्ट मत आहे. हेही वाचा: 'ATKT विद्यार्थ्यांबाबतचा संभ्रम आजही कायम असून त्याबाबत मार्ग उपलब्ध नसल्यानेच त्यातून वेळ मारून नेण्याचा सरकार प्रयत्न करत आहे,' असे मत यावेळी कोकण प्रदेशमंत्री प्रेरणा पवार यांनी व्यक्त केले. 'व्यवस्थित पूर्व तयारी न करता सरकारची परीक्षा रद्द करण्याची लोकप्रिय घोषणा ही विद्यार्थ्यांची निव्वळ फसवणूक आहे,' असा आरोप राष्ट्रीय मंत्री अनिकेत ओव्हाळ यांनी सरकारवर केला आहे. व्यावसायिक, अव्यावसायिक, ATKT वर्गवारी ही दिशाभूलच आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले. व्यावसायिक शिक्षणाचे नाव आपली जवाबदारी केंद्रीय संस्थाकडे ढकलत विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा संभ्रमित करण्याचा प्रयत्न सरकारने केला आहे असे ओव्हाळ यांनी यावेळी सांगितले.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2ChSQUy
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments