एम्स पीजी प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर

Result 2020: ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (AIIMS) ने पीजी २०२० चा निकाल जाहीर केला आहे. उमेदवार एम्सच्या अधिकृत वेबसाईट aiimsexams.org वर जाऊन त्यांचे निकाल तपासू शकतात. एम्सने निकालासह तात्पुरती गुणवत्ता यादी देखील जारी केली आहे. ही यादी विषयांच्या ऑनलाइन जागावाटप किंवा समुपदेशनासाठी आहे. ऑनलाइन जागावाटप किंवा समुपदेशनाची मॉक फेरी रविवारी २१ जून २०२० पासून सुरू होईल. त्यानंतर ऑनलाइन वाटप किंवा समुपदेशनाच्या औपचारिक फेऱ्या सुरू होतील. यासंबंधी सर्व तपशील aiimsexams.org वर उपलब्ध असतील. निकालाच्या यादीमध्ये ज्या उमेदवाराचं नाव नसेल ते उमेदवार त्यांची रँक व पर्सेंटाइल संबंधित अधिकृत वेबसाइट aiimsexams.org १९ जून रोजी किंवा नंतर तपासू शकतात. त्यांना अकॅडेमिक टॅबमधून आपला लॉगइन आयडी आणि पासवर्ड वापरून लॉगिन करावे लागेल. ही परीक्षा ५ जून २०२० रोजी परीक्षा झाली. सुमारे ३३ हजार उमेदवार परीक्षेला बसले होते. आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने सुचविलेले सर्व सुरक्षा उपाय परीक्षेच्या वेळ लागू केले गेले होते. निकाल रोलनंबरनुसार नसून गुणवत्ता क्रमांकांनुसार आहे. यात केवळ अशाच उमेदवारांचा समावेश आहे जे ऑनलाइन वाटप किंवा समुपदेशनासाठी तात्पुरते पात्र आहेत. नवी दिल्ली, भोपाळ, भुवनेश्वर, जोधपूर, नागपूर, पटना, रायपूर आणि ऋषिकेश येथील एम्स रुग्णालयाती विविध एमडी / एमएस / डीएम ६ वर्षे / मास्टर ऑफ सर्जरी ६ वर्षे / एमडीएस अशा विविध पदव्युत्तर अभ्यासक्रमांना या परीक्षेमार्फतच प्रवेश दिला जातो. आपला निकाल असा तपासा - १) एम्सच्या aiimsexams.org या अधिकृत संकेतस्थळावर जा २) मुख्यपृष्ठावर निकालाची लिंक मिळेल, त्यावर क्लिक करा. ३) पीडीएफ फाईल उघडेल. त्यात आपले नाव शोधा. ४) रोल नंबरच्या मदतीने आपले नाव शोधण्यासाठी, आपल्या कीबोर्डची कंट्रोल F की दाबा आणि नंतर सर्च बॉक्समध्ये आपले नाव प्रविष्ट करा.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2NauIFF
via IFTTT

Post a Comment

0 Comments