बनारस हिंदू विद्यापीठात अनेक पदांवर भरती

सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर येथे जरूर लक्ष द्या. बनारस हिंदू विद्यापीठात (BHU) अनेक पदांवर भरती सुरू झाली आहे. बीएचयूने ४७९ शिक्षक आणि ग्रुप ए पदांवर भरती प्रक्रिया सुरू केली आहे. या पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. इच्छुक आणि योग्य उमेदवार bhu.ac.in या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करू शकतात. अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत ३१ जुलै २०२० आहे. ऑनलाइन अर्ज केल्यानंतर उमेदवारांना अर्ज डाऊनलोड करून त्याची हार्ड कॉपी ३ ऑगस्ट २०२० पर्यंत विद्यापीठाकडे जमा करायची आहे. विद्यापीठाने दिलेल्या जाहिरातीनुसार, विविध विभागांमध्ये प्रोफेसर, असोसिएट प्रोफेसर, असिस्टंट प्रोफएसर आणि नॉन टिचींग ग्रुप ए ची रिक्त पदे भरली जाणार आहेत. यातील काही पदे मेडिकल शाखेतील तर काही नॉन मेडिकल टिचींग पदे आहेत. पदांनुसार आवश्यक शैक्षणिक पात्रता वेगवेगळी आहे. शुल्क अनारक्षित, ईडब्ल्युएस आणि ओबीसी वर्गातील उमेदवारांसाठी एक हजार रुपये अर्ज शुल्क आहे. एससी, एसटी आणि पीडब्ल्यूडी प्रवर्गाच्या उमेदवारांना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही. शुल्क जमा करण्याची अंतिम मुदत ३१ जुलै २०२० आहे. असा करा अर्ज इच्छुक आणि योग्य पात्रता असलेले उमेदवार पुढे दिलेल्या थेट लिंकवर क्लिक करून अर्ज भरू शकतात.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2VrBewe
via IFTTT

Post a Comment

0 Comments