Also visit www.atgnews.com
'या' शाळेने मागितला विद्यार्थ्यांचा कोविड चाचणी रिपोर्ट
कोलकात्यातील एका नामांकित शाळेने बुधवारी विद्यार्थ्यांसाठी एक फतवा काढला आहे. आयसीएसई आणि आयएससी म्हणजेच CISCE बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा देण्यासाठी आधी विद्यार्थ्यांना ते कोविड - १९ निगेटिव्ह असल्याचा अहवाल द्यावा लागणार आहे. या परीक्षा जुलै महिन्यात होणार आहेत. काउन्सिल फॉर द इंडियन सर्टिफकेट एक्झामिनेशन्सने विद्यार्थ्यांना त्यांच्या शहरात परीक्षा देण्याची परवानगी दिली आहे. कारण करोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर अनेक जण त्यांच्या मूळ गावी किंवा घरी आहेत. शिवाय परीक्षा देणे हे बोर्डाने ऐच्छिक ठेवले आहे. ज्यांचा आता परीक्षा द्यायची नाही ते नंतरही या परीक्षा देऊ शकणार आहेत. शिवाय ज्यांना परीक्षाच द्यायची नसेल त्यांनाही ती मुभा आहे. या विद्यार्थ्यांना आधीच्या परीक्षांमधील गुणांच्या आधारे गुण देण्यात येतील. या प्रलंबित परीक्षा १ ते १४ जुलै या कालावधीत होणार आहेत. या पार्श्वभूमीवर एका खासगी शाळेने लावलेली नोटीस बुधवारपासून चर्चेत आहे. या नोटीशीत म्हटलंय की, 'जर तुमचा पाल्य परीक्षा देऊ इच्छित असेल, तर पालकांनी त्याची / तिची कोविड चाचणी करावी. ती निगेटिव्ह आली तर परीक्षा देणाऱ्या अन्य विद्यार्थ्यांना संक्रमणाचा धोका कमी होईल.' हा निर्णय विद्यार्थ्यांच्या आणि परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणाऱ्या सर्वच लोकांच्या हिताचा आहे. कारण शाळा कन्टेन्मेंट झोनमध्ये आहे, अशी माहिती सेंट ऑगस्टिन्स डे स्कूलचे मुख्याध्यापक आर. एस. गास्पर यांनी पीटीआय वृत्तसंस्थेला दिली. २५ जूनपर्यंत विद्यार्थ्यांचे कोविड चाचणी रिपोर्ट पालकांनी जमा करायचे आहेत. तत्पूर्वी १९ जूनपर्यंत विद्यार्थी परीक्षा देणार की नंतर देणार की देणारच नाहीत याबाबतच संमतीपत्र द्यायचे आहे. या परीक्षा केंद्राचा हा निर्णय वादात सापडला आहे. या शाळेवर टीकाही होते आहे. शाळा असे कोविड रिपोर्ट मागण्याऐवजी विद्यार्थ्यांचे थर्मल चेकिंग करू शकते, असं काहींचं म्हणणं आहे. २५ जून ला दिलेला रिपोर्ट १ जुलै ला कसा वैध ठरेल, असाही प्रश्न अनेकांनी उपस्थित केला आहे. दरम्यान, यासंबंधी बोर्डाकडून कोणतेही स्पष्टीकरण आलेले नाही.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/30U3Ceb
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments