Also visit www.atgnews.com
मुंबई पालिकेच्या आस्थापना विभागात भरती, १६ जुलैपर्यंत करा अर्ज
BMC Recruitment2021: बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये नोकरीची संधी चालून आली आहे. पालिकेत आस्थापनेवरील हाऊसमन पदांच्या एकूण ९ जागा रिक्त असून त्यासाठी जाहीरात काढण्यात आली आहे. या रिक्त जागा भरण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार दिलेल्या मुदतीपर्यंत अर्ज करु शकतात. वयोमर्यादा या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय ३३ ते ३८ वर्षांदरम्यान असणे गरजेचे आहे. मागासवर्गातील उमेदवारांसाठी ही वयोमर्यादा आहे. आरक्षित उमेदवारांना सरकारी नियमानुसार नोकरीत आरक्षण देण्यात येणार आहे. आरक्षित उमेदवार नसल्यास त्याजागी इतर प्रवर्गातील उमेदवाराचा विचार केला जाणार आहे. १ ऑगस्ट २०२१ ते ३१ जानेवारी २०२१ या कालावधीसाठी ही भरती असणार आहे. पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून दिलेल्या नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत. यासाठी उमेदवार हा बॅचलर ऑफ मेडिसिन आणि बॅचलर ऑफ सर्जरी (एम.बी.बी.एस.) पदवीधारक असणे गरजेचे आहे. उमेदवाराने नोकरी मिळविण्यासाठी वैद्यकीय अधीक्षक कार्यालय, कस्तुरबा रुग्णालय, साने गुरुजी मार्ग, मुंबई- ११ या पत्त्यावर अर्ज करावा. ५ जुलै २०२१ ते १६ जुलै २०२१ मध्ये ११.३० ते ४ वाजेपर्यंत अर्ज स्वीकारले जाणार आहेत. अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख दिनांक १६ जुलै २०२१ आहे. १६ जुलैला ११.३० ते ४ वाजेपर्यंत अर्ज पाठवता येऊ शकतात. यानंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. पोस्टाने पाठविलेले अर्ज गृहीत धरले जाणार नाहीत. उमेदवाराने आपल्या अर्जामध्ये खोटी माहिती भरली असल्यास त्याचा अर्ज रद्द करण्यात येईल. त्याला अपॉईंटमेंटसाठी बोलावण्यात येणार नाही. ब्लॅकलिस्ट केलेल्या उमेदवारांना ग्राह्य धरले जाणार नाही. जे उमेदवार ऑफर स्वीकारणार नाहीत किंवा कामावर रुजू होणार नाहीत, अशा उमेदवारांना म्युन्सिपल मेडीकल इन्स्टिट्यूशनतर्फे ३ वर्षांसाठी कोणत्याही पदासाठी ग्राह्य धरले जाणार नाही. म्युन्सिपल कॉर्पोरेशन ग्रेटर मुंबईतून पास झालेल्या उमेदवारांना नोकरीत प्राधान्य मिळेल. निवड झालेल्या उमेदवारांनी २८ जुलैला सकाळी ११ वाजल्यानंतर दिलेल्या पत्त्यावर हजर राहणे गरजेचे आहे. उमेदवाराचे मेडिकल शिक्षण हे महाराष्ट्र मेडिकल काऊंन्सिलशी संबंधित असायला हवे. निवड झालेल्या उमेदवाराने १० हजाराचा डीडी म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या नावाने डिपॉझिट करायला हवा. कालावधी पूर्ण झाल्यावर ही रक्कम उमेदवाराला परत मिळेल.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3jKrM3V
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments