Also visit www.atgnews.com
सीटीईटी परीक्षेचं अॅडमिट कार्ड कधी?...वाचा
july admit card update: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजेच द्वारे केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेचे (CTET) आयोजन जुलै २०२० मध्ये होणार आहे. अद्यापपर्यंत नियोजित वेळापत्रकानुसार ही परीक्षा ५ जुलै २०२० रोजी घेतली जाणार आहे. आता थोडाच अवधी शिल्लक आहे. ही परीक्षा देणाऱ्या लाखो उमेदवारांना अॅडमिट कार्डाची प्रतीक्षा आहे. सीबीएसईद्वारे सीटीईटी २०२० परीक्षेचं अॅडमिट कार्ड अधिकृत वेबसाइटवर ctet.nic.in वर उपलब्ध करून दिलं जाणार आहे. अद्याप या अॅडमिट कार्डासंबंधी कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. मात्र असे सांगण्यात आले आहे ही बोर्ड जून २०२० च्या तिसऱ्या आठवड्यात सीटेट (CTET) परीक्षेचे प्रवेश पत्र उपलब्ध करणार आहे. जर परीक्षेच्या तारखेत बदल झाला नाही तर या दिलेल्या कालावधीत सीटीईटी जुलै २०२० चे अॅडमिट कार्ड जारी केले जातील. ज्या उमेदवारांनी या परीक्षेसाठी अर्ज भरले आहेत, त्यांना असे कळवण्यात आले आहे ती त्यांनी वेळोवेळी अद्ययावत माहितीसाठी सीटीईटी २०२० च्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन ताजी माहिती जाणून घ्यावी. परीक्षा किंवा अॅडमिट कार्डबद्दल कोणतीही माहिती उमेदवारांना कळवायची असेल तर त्याचे अपडेट संकेतस्थळावर देण्यात येतील. असं असेल परीक्षेचं वेळापत्रक सीबीएसई सीटीईटी २०२० चे आयोजान रविवारी ५ जुलै २०२० रोजी केलं जाणार आहेत. परीक्षेत दोन पेपर्स असतील. पेपर १ ची परीक्षा सकाळी ९.३० ते दुपारी १२ वाजेपर्यंत असेल. पेपर २ ची परीक्षा दुपारी २ ते सायंकाळी ४.३० वाजेपर्यंत असेल. देशभरातील हजारो परीक्षा केंद्रांवर सीबीएसई बोर्ड २० भाषांमध्ये सीटीईटी घेणार आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/381Mhl7
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments