CMA फाउंडेशन जून परीक्षेसाठी प्रवेशपत्र जाहीर, या लिंकवरून करा डाउनलोड

CMA 2021: CMA फाउंडेशन जून २०२१ परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची माहिती आहे. इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICMAI) ने फाउंडेशन परीक्षा २०२१ साठी प्रवेशपत्र जाहीर केले आहे. सीएमए फाउंडेशन जून २०२१ परीक्षेसाठी नोंदणी केलेले असे सर्व उमेदवार आयसीएमएआयच्या अधिकृत वेबसाइट icmai.in वरून त्यांचे सीएमए परीक्षेचे प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात. जून २०२१ टर्म च्या फाऊंडेशन परीक्षा ५ सप्टेंबर २०२१ पासून ऑनलाइन माध्यमातून होणार आहे. CMA Admit Card : असे करा डाऊनलोड CMA फाउंडेशन प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी विद्यार्थ्यांना अधिकृत वेबसाइटवरील एक्झाम टॅबवर जा. प्रवेशपत्राच्या लिंकवर क्लिक करा. नवीन पेजवर जाऊन कोर्स (फाउंडेशन) निवडावा उमेदवारांनी त्यांचा नोंदणी क्रमांक सबमिट करावा. उमेदवार आपले प्रवेशपत्र डाउनलोड आणि प्रिंट करू शकतात. प्रवेशपत्र डाउनलोड केल्यानंतर उमेदवारांनी त्यावर दिलेले सर्व तपशील काळजीपूर्वक वाचावेत. कोणत्याही प्रकारची त्रुटी आढळल्यास शक्य तितक्या लवकर ICMAI ला कळवावे. उमेदवार संस्थेचे हेल्प डेस्क क्रमांक ०३३-४०३६४७७७, २२५२१०३१, ०३३-२२५२१६०२/ १६१९/७३७३/७१४३/२२०४ वर फोन करु शकता. किंवा ईमेल आयडी exam.helpdesk@icmai.in वर मेल करून मदत मिळवू शकतात. सीएमए फाउंडेशनची परीक्षा आयसीएमएआयद्वारे ऑनलाईन होम-प्रोक्टेड मोडमध्ये घेतली जाणार आहे जी मोबाईल/लॅपटॉप/डेस्कटॉप/टॅब वापरून दिली जाऊ शकते. उमेदवारांना सीएमए फाउंडेशन परीक्षेच्या सत्र १ साठी सकाळी १० वाजता आणि सत्र २ साठी दुपारी २ वाजता लॉगिन करावे लागेल.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/38oMqzY
via IFTTT

Post a Comment

0 Comments