सर्वसहमतीनंतरच उघडतील देशातील शाळा: पोखरियाल

देशभरातील नेमक्या कधी उघडल्या जाणार याबाबत केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री डॉ. यांनी माहिती दिली आहे. ते म्हणाले, 'सध्या तरी शाळा उघडण्याची निश्चित तारीख ठरलेली नाही. शाळा उघडण्याची प्रक्रिया कधी आणि कशी सुरू करायची यावर कोणताही निर्णय ऑगस्टनंतर ताजी स्थिती लक्षात घेऊन त्यानुसार घेतला जाईल.' पोखरीयाल यांच्या मते शाळा सुरू करण्यापूर्वी शिक्षक, पालक, शिक्षण संस्था आणि अधिकाऱ्यांशी चर्चा करणे आवश्यक आहे. सर्वांच्या सहमतीने याविषयी खूप विचारपूर्वक पावले उचलली गेली पाहिजेत. एका चर्चेदरम्यान ते बोलत होते. शाळा पुन्हा सुरू करण्याविषयी ऑगस्टनंतरच प्रक्रिया सुरू होईल. कोविड - १९ संक्रमणाचा प्रत्येक राज्यातील स्थितीचा आढावा घेतल्यानंतरच यासंबंधी काही निर्णय होईल. मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, शाळा उघडण्यापूर्वी शैक्षणिक संस्थांना विश्वासात घेणे गरजेचे आहे. शाळा उघडण्याचा निर्णय विद्यार्थी किंवा शाळांवर जबरदस्ती थोपवला जाणार नाही. यासंबंधी सर्व संबंधित घटकांची सहमती आणि सुरक्षा आवश्यक आहे. विविध राज्य सरकार आपापल्या राज्यातील करोनोस्थितीनुसार शाळांसंबंधी निर्णय घेण्यास स्वतंत्र आहेत. शाळांना त्या त्या राज्याच्या शिक्षण विभागाच्या निर्देशांचे पालन करावे लागेल तर केंद्रीय विद्यालयांना तसेच नवोदय विद्यालयांना केंद्रीय मनुष्यबळ विभागाच्या अखत्यारित निर्देश पाळावे लागतील. म्हणूनच देशात या मुद्द्यावर एक मत स्थापित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर यावर्षी विविध इयत्तांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा कमी करण्याच प्रयत्न केला जात आहे. तूर्त तरी याचा लाभ केवळ शालेय विद्यार्थ्यांना मिळेल. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने अभ्यासक्रम कमी करण्याच्या तसेच अन्य संबंधित मुद्द्यांवर संपूर्ण देशातील शिक्षणतज्ज्ञ, शिक्षण संस्था आणि शिक्षकांकडून सूचना मागवल्या आहेत.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/37BUFaq
via IFTTT

Post a Comment

0 Comments