सीबीएसई भरती परीक्षेची उत्तरतालिका जाहीर

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने सहाय्यक सचिव, लेखापाल, कनिष्ठ सहाय्यक आणि इतर विविध पदांसाठी घेण्यात आलेल्या भरती परीक्षेची उत्तरतालिका आपल्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केली आहे. ज्या उमेदवारांनी परीक्षा २०२० दिली आहे ते सीबीएसईच्या अधिकृत संकेतस्थळावर .nic.in वर ही उत्तरतालिका पाहू आणि डाउनलोड करू शकतात. सीबीएसईने २८, २९, ३० आणि ३१ जानेवारी २०२० रोजी अनेक परीक्षा केंद्रांवर या भरती परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. भरती परीक्षेची उत्तरतालिका कशी पाहाल? १. सीबीएसईच्या cbse.nic.in च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. २. मुख्य पृष्ठावरील CBSE Recruitment 2019-answer key या पर्यायावर क्लिक करा. ३. यानंतर आपण सीबीएसई वेबसाइटच्या नवीन पृष्ठावर जाल. ४. आपण ज्या पदासाठी अर्ज केले होते ते निवडा. हेही वाचा: ५. स्क्रीनवर तुमची सीबीएसई भरती उत्तरतालिका दिसेल. ६. सीबीएसई भरती उत्तरतालिका डाऊनलोड करा आणि भविष्यातील वापरासाठी प्रिंट आउट घ्या उमेदवार सीबीएसईच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन खाली दिलेल्या थेट लिंकवरुनही उत्तरतालिका डाउनलोड करू शकतात.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3e4KQo1
via IFTTT

Post a Comment

0 Comments