CTET परीक्षा: मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिकांसाठी क्लिक करा...

2020: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने ( सीबीएसई ) केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेचे (सीटीईटी) मागील वर्षांचे पेपर्स उपलब्ध करून दिले आहेत. सीटीईटी परीक्षा ५ जुलै रोजी होणार आहे. ज्यांनी या परीक्षेसाठी अर्ज केला आहे ते मागील वर्षाच्या पेपर्सच्या मदतीने चांगली तयारी करू शकतात. गेल्या वर्षीचे पेपर्स ctet.nic.in या वेबसाइटवर उपलब्ध करण्यात आले आहेत. सीटीईटी २०२० साठी ३० लाखाहून अधिक उमेदवारांनी नोंदणी केली आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेपेक्षा यंदाची उमेदवारांची संख्या जास्त आहे. डिसेंबरमध्ये झालेल्या परीक्षेसाठी २८ लाख ३२ हजार उमेदवारांनी नोंदणी केली होती. जे सीटीईटी उत्तीर्ण होतात त्यांना शिक्षक म्हणून नोकरी मिळण्यास पात्र मानले जाते. जे पेपर १ ची परीक्षा देतील ते पहिली ते पाचवीच्या इयत्तांना शिकविण्यास पात्र असतील तर जे पेपर २ क्लिअर करतात ते इयत्ता ६ वी ते ८ वी च्या वर्गांना शिकवण्यास पात्र ठरतात.
    परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी उमेदवारांना १५० गुणांपैकी ६० टक्के गुण मिळविणे आवश्यक आहे. राखीव प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी कट ऑफ ५५ टक्के आहे. ५५ टक्के म्हणजे १५० पैकी ८२ गुण होतात. सीटीईटी डिसेंबर २०१९८ मध्ये एकूण ५ लाख ४२ हजार उमेदवार उत्तीर्ण झाले होते.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2YgSQN3
via IFTTT

Post a Comment

0 Comments